आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Story On The Occasion Of Mothers Day On Symbol Of Mothers Love Bibi Ka Makbara

MOTHERS DAY SPL: मातृप्रेमाचे प्रतिक 'बीबी-का-मकबरा' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या प्रेमाखातर शहेनशाहा शाहजहानने आग्र्याला ताज महाल बांधला तर, दुस-या एका शहेनशाहाच्या मुलाने आईच्या प्रेमाखातर ताज महालची प्रतिकृती उभारली. आजही या मातृप्रेमाच्या प्रतिकाला 'दख्खन का ताज' म्हणून संबोधले जाते. बादशाह औरंगजेबाचा मुलगा शहजादा आजमशाह याने आईच्या स्मरणार्थ 'बीबी-का-मकबरा' बांधला. मोगल आणि निझाम स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असलेला बीबी-का-मकबरा आजही लाखो पर्यटकांना औरंगाबादकडे आकर्षीत करतो.

शहजादा आजमशाहची आई राबिया-उल-दौरानी ही औरंगजेबची आवडती राणी होती. दिलरास बानो बेगम या नावाने ती प्रसिद्ध होती. तिच्या हयातीतच मकबर्‍याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.