आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speech Of Balasaheb Thackeray In First Dasara Melawa

बाळासाहेब ठाकरेंचा पहिला \'मेळावा\'..वाचा काय म्हणाले होते शिवसेनाप्रमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर मेळावा घेतला. या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहून राज ठाकरे सुखावले असणार यात शंका नाही. बाळासाहेबांकडूनच राज ठाकरे यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शिवसेनेचा दसरा मेळावा अविरतपणे सुरू आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे काम त्यांच्या स्टाइलने चालवले. राज्यात त्यांच्या पक्षाचा आलेख फार चढता राहिलेला नसला तरी लोकांमध्ये त्यांची लोकप्रियताही कमी झालेली नाही हे विशेष. पक्षाला एक नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरे यांनीही शिवसेनेप्रमाणे मेळाव्याची सुरुवात केली. मराठीच्या मुद्यावरच आधारित राज यांच्या पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी निवडही केली ती मराठी नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडव्याची. शिवाजी पार्कवर आलेली गर्दी पाहून अनेकांना बाळासाहेबांची आठवण झाली. बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण ऐकण्यासाठी दसऱ्याला राज्यभरातून शिवसैनिक आलेले असायचे. राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्याची पाळं मुळं ज्या दसरा मेळाव्यात आहेत, त्या पहिल्या वहिल्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच भाषण आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा होता बाळासाहेब ठाकरेंचा पहिला दसरा मेळावा..