आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा, लाजर्‍याबुजर्‍या खारूताईची भन्नाट मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे बालपण इतर लहानमुलांप्रमाणेच कार्टून पाहाण्यात गेले. मात्र आतासारखे त्यावेळी काही कार्टून चॅनल्स नव्हते. आज जसे 24 तास 'छोटा भीम', 'डोरेमॉन', 'शिनचॅन' ही मंडळी बच्चाकंपनीचे ज्याप्रमाणे मनोरंजन करत असते तशी सुविधा मी लहान असताना नव्हती. कारण त्यावेळी टीव्ही भारतात येऊनच मुळी एखाद दशक झाला असेल. त्यातल्या त्यात आमच्या घरी दुरदर्शनच दिसायचे. त्यामुळे बाकी चॅनल्सचे मला काहीच माहित नव्हते. मात्र दर रविवारी येणारे 'चीप अँड डेल' हे कार्टून माझा आवडीचा विषय. मी न चुकता हा कार्यक्रम पाहायचो. लहान असताना हे फक्त कार्टूनच आहे असंच वाटायचं. मात्र जस जसा मोठा होत गेलो तेव्हा हे कार्टून मुळात जमीनीवरील प्राण्याची प्रतिकृती आहे असे कळाले.

मराठीत खारूताई, हिंदीत गिलहरी आणि इंग्रजीत स्क्वीरल अशी ओळख असणार्‍या या प्राण्याची ओळख मला सर्वात पहिले याच कार्टूनच्या माध्यमातून झाली. त्यानंतर चित्रकलेची आवड लागल्यानंतर मी सर्वात पहिले याच चिप अँड डेलचे कार्टून काढले आणि या प्राण्याबद्दलची माझी जवळीकता अधिकच वाढली.
पुढे मी कॉलेजात गेलो तेव्हाही झाडाखाली मित्रांशी गप्पा मारत बसलो की, झाडावरून ही खारूताई हळूच डोकवायची, आमच्या आजूबाजूला खेळायची. या प्राण्याची आणि माझी अशीच अनेकदा भेट झाली. परवा मी माझा नवीन कॅमेरा घेऊन विद्यापीठात काही कामानिमित्त गेलो असता तेथील रमणीय वातावरण पाहून मला फोटोग्राफीचा मोह आवरला नाही. कॅमेरा घेऊन मी जसा विद्यापीठात फिरायला लागलो तेव्हा तेथे झाडावरून खाली उतरून खेळत असलेल्या याच खारूताईने माझे लक्ष वेधले आणि पुन्हा माझा कॅमेरा स्वतःकडे वळवून घेण्यास ती यशस्वी ठरली. तिची मस्ती, तिची धावपळ मी लगेच कॅमेर्‍यात कैद करून घेतली. आज तुमच्यासमोर त्याच क्षणातील काही फोटो ठेवत आहे...
अपेक्षा आहे तुम्हाला नक्कीच आवडतील...

पुढील स्लाईडमध्ये बघा, खारूताईचे वेगवेगळ्या हावभावातील फोटो...
सर्व फोटो - राहुल रणसुभे