आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srikant Bedekar Article About Maharashtra Politics, Divya Marathi

पक्ष, नेते आणि राजकारणातील परिवर्तन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमत: नगर जिल्हा हा कम्युनिस्ट पक्षाचा आधार होता कै. यशवंतरावाच्या पुढाकाराने हळूहळू कॉग्रेस पक्ष बहरु लागला. डाव्या विचारांची अनेक नेत-कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये आले. कै. आप्पासाहेब शिंदे, कै. भाऊसाहेब थोरात, कै. आबासाहेब निंबाळकर बाळासाहेब विखे, कै. मारुतराव धुळे, इ नवतरुण नेत्यांनी कॉंग्रेसला साथ द्ल्यिाने जिल्हा कॉंग्रेसमय झाला. सर्वश्री बाबासाहेब विखे, खताळ अशा मोजत्याच नेत्यांचा एक गट तयार झाला तर दुसर्‍या बाजूला काळे, कोल्हे, घुले, निंबाळकर यांचा मोठा गट अस्तित्वात आला. तथापी हे सर्वच नेते विचारी व पक्षाला मानणारे असल्याने सत्ताप्राप्तीसाठी स्पर्धा होत असली तरी गटबाजी चव्हाट्यावर येत नव्हती.प्रसंगी कार्यकर्ते एक होऊन सत्तेचा समतोल राखला जात होता. परंतू नंतरच्या काळात मात्र हे चित्र आमूलाग्र बदलले. सत्तेसाठी स्वार्थ, संपत्ती स्पर्धा सुरु झाली.

विचारांची आणि कृतीची जागा विकाराने व कारवाईने घेतली व त्यातूनच सत्तेचा संघर्ष वाढत गेला. पक्षाच्याऐवजी नेत्यांच्या टोळ्या तयार झाल्या चांगल्या कार्यकर्त्यांऐवजी स्वत:च्या मुलांनाच नेते बनविण्याच्या कार्याला जोर आला. त्यातच 1969, 1977, 1980 व नंतर अनेकवेळा देशपातळीवर पक्ष दुभंगत गेला. नवे नेते म्हणजे एखाद-दुसरा अपवाद वगळता नेत्यांची मुले, सुना, जावई पुढे आले. त्यातील अनेकांना पक्ष काय हे तरी कळले होते का. सत्ता, संपंत्ती हेच ध्येय ठरले. बदलत्या राजकीय व सामाजीक परिस्थितीच्यामुळे नवे पक्ष अस्तित्वात आले. मराठी माणसाची कड घेवून शिवसेना, धर्माच्या आधारावर जनसंघ आजचा भाजप, दलितांचा म्हणून ओळखले जाणारे आरपीआयचे विविध घटक पक्ष निर्माण झाले. अगदी अलिकडे मनसे हा पक्ष निर्माण झाला. यासह अनेक पक्षांच्या शाखा नगर जिल्ह्यात आहेत.

कॉंग्रेसची ही दुरावस्था नेतृत्वाच्या अभावाने झालेली आहे. आज सगळ्यात विस्कळीत, नेतृत्वहीन, संघटनेचा अभाव असलेला पक्ष म्हणजे कॉंग्रेस असा कॉंग्रेसचा नावलौकीक झालेला आहे. कारण नेत्यांच्या टोळ्या म्हणजे त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी आपल्या नेत्यांच्या मागेपुढे करणे, पक्षाच्याच दुसर्‍या नेतृत्वावर बेताल टिका करणे, नेत्यांची मर्जी पाहून पदरात काय पाडून घेता येईल हीच कार्यकर्त्यांची गुणवत्ता ठरली आहे. राष्ट्रवादीत शरद पवार यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यातसुध्दा गट-तट असूनही ते फारसे उघड होत नाही. शिवसेनेत फक्त एकच नेतृत्व मानले जाते व त्याच्याविरुध्द सहसा कोणी जात नाही एकतर कार्यकर्ता पक्षात तरी राहतो वा पक्ष सोडून जातो. मग तिथे थोडे दिवस कौतुक होते नंतर तिथे आधीचे असलेले कार्यकर्ते मग त्याला पध्दतशीरपणे बाजूला सारतात. जनताही अशा पक्ष बदलणार्‍यांना फारशी थारा देत नाही. भाजप हा पक्ष बराच संघटीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हा पक्ष चालवतो त्यामुळे बर्‍याच प्रमाणात त्यात शिस्त दिसते कार्यकर्तेही दिसतात.