‘दुपारी तीन वाजता आम्ही दिल्लीहून गुवाहाटीला पोहोचलो. तेथून कारने शिलाँगला निघालो. पोहोचायला अडीच तास लागले. सहसा कलाम कारमध्ये झोपी जात. मात्र या वेळी ते गप्पा मारत राहिले. शिलाँगमध्ये जेवण करून आम्ही आयआयएममध्ये पोहोचलो. ते भाषणासाठी उभे राहिले. मी मागेच उभा होतो. त्यांनी मला विचारले -‘ऑल फिट?’ मी म्हणालो-‘यस सर!’ दोन वाक्येच बोलले आणि कोसळले. मीच त्यांना उचलले. रुग्णालयात नेले, पण वाचवू शकलो नाही.
एक शिक्षक म्हणूनच मी स्मरणात राहावे, असे साहेब नेहमी म्हणत आणि शिकवता शिकवताच ते गेले. ‘पृथ्वी जगण्यालायक कशी बनवायची? हे त्यांचे शेवटचे वाक्य.
कारमध्ये रस्त्यानेही ‘संसदेची कोंडी कशी फोडायची?,’असे म्हणत होते. मग म्हणाले, आयआयएमच्या विद्यार्थ्यांनाच विचारतो.’