आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Staff Appointed Insteaded Of Extra Information On Internet

इंटरनेटवर अधिक माहिती नको म्हणून केली कर्मचा-यांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोहेल रिझवी : रिझवी ट्रान्सव्हर्स मॅनेजमेंट या प्रायव्हेट
इक्विटी
* जन्म : 1966, भारतात
* वडील : राजा रिझवी
* शिक्षण : वॉटर्न स्कूल ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनिया
* काम : व्हेंचर कॅपिटलिस्ट
न्यूयॉर्क येथील सोहेल रिझवी यांची रिझवी ट्रान्सव्हर्स मॅनेजमेंट ही कंपनी दोन वर्षांपासून ट्विटरचे समभाग खरेदी करत होती. त्यामुळे ट्विटरचा इश्यू येईपर्यंत सोहेलच्या कंपनीकडे एकूण शेअर्सच्या 15 टक्के शेअर जमा झाले होते. ट्विटरचे संस्थापक इवान विल्यम्स ट्विटरचे सीईओपद सोडत असून त्यांना दहा टक्के शेअर्स विकायचे असल्याचे ट्विटरचे गुंतवणूकदार क्रिस्टोफर साका यांनी रिझवी यांना 2010 मध्ये सांगितले होते. सोहेलने संधी न दवडता 3400 लाख डॉलरमध्ये हे शेअर्स खरेदी केले. बाहेरच्या गुंतवणूकदाराला ठरावीक शेअर्सच द्यायचे, असे ट्विटरचे धोरण आहे. मात्र तरीही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रायव्हेट इक्विटी फर्म चालवणा-या रिझवी यांना सूट देणे ट्विटरला भाग पडले. शांत राहून काम करणे हे सोहेल यांच्या स्वभावातच आहे. आपल्या संदर्भात इंटरनेटवर असलेली माहिती लगेचच काढण्यासाठीही त्यांनी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त केले असल्याचे बोलले जाते. कदाचित त्यामुळेच इंटरनेटवर त्यांच्याबाबत अगदी मोजकी माहिती व मोजकीच छायाचित्रे मिळतात. ग्रीनवीचसारख्या उच्चभ्रू भागात त्यांचे तीन बंगले आहेत. त्यांनी बिल गेट्स आणि मायकल ब्लूंबर्ग यांच्याजवळ जमीन घेतली आहे. फ्लोरिडाच्या पाम बीचवर त्यांची 1.65 एकर जमीन आहे. सोहेल यांचे मूळ भारतात आहे. ते जेव्हा पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील राजा रिझवी अमेरिकेत गेले होते. ते एल्सवर्थ कम्युनिटी कॉलेजमध्ये सायकॉलॉजीचे प्राध्यापक होते. सोहेलचे मोठे भाऊ अशरफ हेड फंड मॅनेजर आहेत. वॉचर्न बिझनेस स्कूलमधून एमबीए केल्यानंतर सोहेल रिअल इस्टेट अ‍ॅनालिस्ट बनले. पण त्या कामात ते रमले नाहीत. काही पैसा जमवून त्यांनी एक टेलिकॉम कंपनी खरेदी केली. पण अगदी कमी कालावधीत ती विकली आणि पैसा उभा केला. तेव्हा तिची उलाढाल 100 लाख डॉलरची होती. रिझवी यांनी ती 4500 लाख डॉलरपर्यंत नेली.
2005 मध्ये त्यांनी एक मोठा डाव खेळला. त्यांनी हॉलीवूड अभिनेते, टीव्ही सेलिब्रिटी, लेखक आणि प्रकाशक यांचे काम पाहणारी इंटरनॅशनल क्रिएटिव्ह मॅनेजमेंट कंपनी खरेदी केली. भरपूर फायदा मिळाल्यानंतर त्यांनी तीही विकली. रिझवी यांनी त्या काळात प्लेबॉय मॅगझिनचे संस्थापक हग हेफनर यांचीही मदत केली. त्याशिवाय फेसबुक, फ्लिपबोर्ड आणि स्क्वेअरमध्येही त्यांची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे या इश्यूमुळे ट्विटरच्या संस्थापकांनाही तेवढा नफा मिळवता आला नाही, जेवढा सोहेल यांनी मिळवला. त्यांच्या कंपनीच्या महत्त्वाच्या क्लायंट्समध्ये सौदीचे प्रिन्स अलवालिद बिन तलाल आणि जेपी मोर्गन चेस यांचा समावेश आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच प्रिन्स यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचे सीईओ डीक कोस्टोलो यांची भेट घेतली होती. रिझवी यांचे जॉर्डनची राणी नूर आणि गुगलचे लॅरी पेज आणि एरिक श्मिट यांच्याशीही निकटचे संबंध आहेत.