आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Election Poll, Divya Marathi Readers Servey In Maharashtra

वाचकांचा कौल: राज्य सरकार सपशेल नापास; भावी मुख्यमंत्री हवा महायुतीचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या वाचक सर्वेक्षणात राज्यातील विद्यमान आघाडी सरकारच्या कामगिरीवर बहुसंख्य लोकांनी नापसंतीची मोहोर उमटवली आहे. याउलट केंद्रातील मोदी सरकारची आतापर्यंतची कारकीर्द समाधानकारक असल्याचे लोकांचे म्हणणे असून गेल्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा प्रभावही जाणवण्या इतपत असेल, असा एकंदर सूर आहे. राज्यातील पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असावा, असे मत सर्वाधिक लोकांनी व्यक्त केले असून त्यापाठोपाठ शिवसेनेला पसंती दर्शविली आहे. तर, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक लोकांची अनुकूलता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर....
‘दिव्य मराठी’ने वाचकांसमोर मोजके पाच प्रश्न ठेवून त्याविषयी आपली मते व अंदाज कळवण्याचे आवाहन केले होते. त्याला एवढा भरभरून प्रतिसाद लाभला की दिलेल्या मुदतीत संबंधित मोबाइल क्रमांकांवर एसएमएस आणि व्हॉट्सअँप संदेशांचा अक्षरश: धो धो पाऊस पडला. आलेल्या हजारो संदेशांच्या सखोल विश्लेषणाअंती ‘दिव्य मराठी’ चमूने काढलेल्या निष्कर्षांची ग्राफिक्सच्या माध्यमातून केलेली मांडणी पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा....