आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीव्ह जॉब्सच्या कार्यातून नेतृत्वगुणाचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली शिकवण : पूर्ण जबाबदारी उचला
सिम्पलीसिटी साध्य करण्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि पेरिफेरल डिव्हाइसेस एकमेकांशी असे जोडावे, की ते एकच डिव्हाइस वाटावेत, हे स्टीव्ह जॉब्स यांना ठाऊक होते. अ‍ॅपल इकोसिस्टमच्या उदाहरणातून हे समजून घेऊ या. यामध्ये आयपॅडला आयट्यून सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मॅकशी जोडले होते.
यामुळे डिव्हाइस हाताळणे अधिक सोपे झाले होते. या उपकरणात उपभोक्त्यांचा अनुभव वापरण्याची जबाबदारी जॉब्स आणि अ‍ॅपलने घेतली होती. आयफोनमध्ये एआरएम मायक्रोप्रोसेसरच्या परफॉर्मंसपासून एका अ‍ॅपल स्टोअरमध्ये तोच फोन विकत घेण्यापर्यंतचा अनुभवातील प्रत्येक पैलू परस्परांशी जोडण्यात आला होता. अ‍ॅपलने मोकळेपणा ठेवल्यामुळेच हार्डवेअर निर्मात्यांना अ‍ॅपलचे सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम वापरणे शक्य झाले.
संपूर्ण उपकरणाची जबाबदारी स्वत: घेण्यावर जॉब्स यांचा भर होता. पकड बळकट असलेल्या त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा हा परिणाम होता. अचूक आणि आकर्षक उत्पादन तयार करण्याच्या ध्यासालाही याचे श्रेय जाते. अ‍ॅपलचे शानदार सॉफ्टवेअर इतर कंपनीच्या नीरस हार्डवेअरवर चालवण्याची नुसती कल्पनाही त्यांना नकोशी वाटत असे. प्रमाणित नसलेले सॉफ्टवेअर व इतर साहित्य अ‍ॅपलच्या परफेक्शनवर प्रतिकूल परिणाम करू शकतात, असे त्यांचे मानणे होते. अल्पावधीत होणारे फायदे मोठ्या प्रमाणात न देण्याचा हा दृष्टिकोन होता. भंगार उपकरणे, चुकीचे संदेश व चीड आणणा-या अनेक गोष्टींनी भरलेल्या या जगात हा दृष्टिकोन उपभोक्त्याच्या अनुभवातील अद्भुत उत्पादनांची ओळख करून देतो. ध्येयवेड्या पण नियंत्रित हातात सर्र्वकाही सोपवणे कधी कधी योग्य असते.


स्रोत हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू