आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:मध्येच शोधा सोपे करण्याचे कौशल्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनातील नेतृत्वाचे धडे या मालिकेत प्रकाशित केले जात आहेत. आज वाचा तिसरा धडा

तिसरी शिकवण : सरलता
अटारीतील रात्रपाळीदरम्यान जॉब्ज यांनी सरलतेचा धडा घेतला. त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासूनच सहज आणि सरळपणा त्यांच्या स्वभावाचा भाग बनला. कोणतीही गोष्ट मुळापासून समजून घेतल्यास त्यातील अनावश्यक घटक काढून, ती सरळ करता येऊ शकते, असे जॉब्ज यांचे मत होते. सरलतेमध्ये सौंदर्य दडलेले असते. त्यामुळे अ‍ॅपलने नेहमी सरलतेवर भर दिला आहे.

सत्तरच्या दशकात अ‍ॅस्पेन संस्थेत झालेल्या डिझाइन विषयावरील एका संमेलनात जॉब्ज यांचा सरलतेसाठीचा आग्रह स्पष्टपणे दिसून आला. पालो अल्टो या झेरॉक्सच्या संशोधन केंद्रात गेले, त्या वेळी जॉब्जनी तेथील इंटरफेस आणि माऊसवर चालणारा संगणक पाहिला. तेव्हाच त्यांनी त्याचे आणखी चांगले डिझाइन बनवण्याचे ठरवले. त्यांना ते आणखी सरळ, सहज करायचे होते. उदाहरणार्थ- झेरॉक्सच्या माऊसला तीन बटणे होती. त्यांची किंमत 300 डॉलर होती. त्यासाठी जॉब्ज स्थानिक औद्योगिक डिझाइन संस्थेत गेले. तेथील संस्थापकांपैकी एक असलेल्या डीन होवे यांची भेट घेतली. त्यांना म्हणाले की, आम्हाला एका बटणाचा सरळ, सोपा माऊस तयार करायचा आहे. डीन यांनी तो बनवला. त्यासाठी फक्त 15 डॉलर खर्च आला.

कठीण आणि गुंतागुंतीच्या गोष्टी सोडून देण्याऐवजी त्या समजून घेऊन सरळ केल्या पाहिजेत, असे जॉब्ज यांचे मत होते. एखाद्या मशीनमध्ये एवढा सहजपणा असायला हवा की, युजर कधीही त्यावर काम करायला गेल्यास त्याचे काम सोपे व्हावे. काम करण्यासाठी झगडावे लागता कामा नये, पण अशा मशीनसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अ‍ॅपलचे औद्योगिक डिझायनर जॉनी आयव्ही हे जॉब्ज यांना अगदी हवे तसे व्यक्ती होते. एखादी गोष्ट आणखी सोपी करण्याचे तंत्र त्यांना उत्तम अवगत होते.

आयपॉडचे डिझाइन तयार करताना हे उत्पादन गुंतागुंतीचे नसावे, यासाठी जॉब्जचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे आयपॉड तयार करताना आपल्याला हवी असलेली गोष्ट फक्त तीन क्लिकमध्ये मिळावी, या गोष्टीवर भर देण्यात आला. उदाहरणार्थ नेव्हिगेशन स्क्रीनवर युजरला विचारले जात होते की, त्याला काय हवे आहे? गाणे, अल्बम की कलाकार? त्या दरम्यान जॉब्स्रनी विचारले की, आपल्याला स्क्रीनची गरज आहे का? तेव्हा डिझा/नर्सना जाणवले की खरोखरच स्क्रीनची गरज नव्हती. एकदा जॉब्ज म्हणाले की, मला चालू-बंद करण्याचे बटण नको. सुरुवातीला टीममधील सदस्यांना हा सल्ला विचित्र वाटला, पण नंतर त्यांना वाटले की खरोखरच अशा बटणाची काहीच गरज नाही. या उपकरणाचा वापर नसेल, त्या वेळी ते आपोआप बंद होईल आणि वापरासाठी घेताच आपोआप सुरू होईल. 2001 मध्ये पोर्टेबल म्युझिक प्लेअरच्या गरजेतून आयपॉड आणि आयट्यून स्टोअर तयार करण्यात आले. त्यानंतर मोबाइलचा नंबर आला.