आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या कर्मचा-यांकडून मोठी कामेच घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टीव्ह जॉब्ज यांच्या आयुष्यावर आधारित नेतृत्वगुण मालिका प्रसिद्ध करत आहोत. या सदरात त्यांची नववी शिकवण वाचा.


नववी शिकवण : टॉलरेट ओन्ली ‘अ’ प्लेअर्स सर्वोत्कृष्ट कर्मचा-याला सोबत घेणे जॉब्ज आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत तत्परता दाखवत. असे असले तरी ते त्यांची स्तुती करत नव्हते. कामात परिपूर्णता असावी यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यासाठी ते सर्वोत्कृष्ट व्यक्तींनाच प्राधान्य देत होते.

स्वत: योग्य लोकांसमवेत काम करणे आणि कंपनीचा चुकीच्या व्यक्तींपासून बचाव करण्याच्या पद्धतीला ते ‘द बोजो एक्सप्लोजन’ म्हणत. यामध्ये सामान्य व्यक्तींनी रेंगाळत काम करू नये यासाठी व्यवस्थापक कडक भूमिकेत वावरतात. आपण कामाप्रती बांधील राहावे, असे मी लोकांना त्यांच्या तोंडावर सांगतो, असे जॉब्ज म्हणत होते.

आपण हे काम चांगले बोलूनही करू शकत होता, असे त्यांना म्हटलो होतो. यावर त्यांचे उत्तर होते, तसे मी करू शकलो असतो, मात्र त्या वेळी आताचा मी असलो नसतो. यापेक्षा आणखी चांगल्या पद्धती असू शकतात. लोकांना गोड गोड बोलून मते सांगितली जात असतील. मात्र, मी कॅलिफोर्नियातील एक मध्यमवर्गीय व्यक्ती असल्यामुळे मला अशा गोष्टी जमत नाहीत, असे जॉब्ज यांचे म्हणणे होते, असे त्यांचे चरित्रलेखक वॉल्टर इसॅकसन म्हणाले.
त्यांचे हे वर्तन आवश्यक होते का? तर तसे अजिबात नाही. आपल्या टीमला प्रेरणा देता येईल अशा अनेक पद्धती आहेत. त्यांचे मित्र व अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वॉज्नियाक म्हणतात की, लोकांवरील दहशतीशिवाय जॉब्ज चांगले काम करू शकत होता. मला कोणत्याही वादाशिवाय धैर्याने काम करायला आवडते. कंपनी एक चांगल्या कुटुंबाप्रमाणे राहू शकते, असा मी विचार करतो; परंतु त्याचबरोबर मेकिनतोशचा प्रोजेक्ट मी केला असता तर त्यात अनेक त्रुटी राहण्याची शक्यता होती, हे सांगायलाही वॉज्नियाक विसरत नाहीत. जॉब्ज यांचा दृष्टिकोन व कर्तव्यदक्ष स्वभावातून प्रेरणा मिळते. ते कर्मचा-यांमध्ये अशा काही पद्धतीने आत्मविश्वास जागवत की त्यांच्या हातून उत्कृष्ट उत्पादनाची निर्मिती केली जाई. त्यांच्यामुळे टीम अशक्यप्राय वाटणारे काम पूर्णत्वास नेत होती. जॉब्ज जाणून घ्यावयाचे असतील तर त्यांच्या कार्यसिद्धीचे मोजमाप करावे. जॉब्ज आपल्या कुटुंबाप्रमाणे अ‍ॅपलशी जोडले गेले होते. जॉब्ज मला म्हणाले होते, आपल्याजवळ चांगली माणसे आहेत, याचा अर्थ ते चांगले काम करतील, अशी आशा करू नका. त्यांच्याकडून सर्वश्रेष्ठ कामे करून घ्या. मॅक यांच्या टीमला विचारा, काम कसे झाले, त्यावर ते आपल्या वेदना ऐकवतील.