आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वर्षांच्या मुलीने मुलांसाठी बनवले अॅप, वाचा यशोगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीपल पानाचा आज तिसरा वर्धापन दिवस आहे. चौथ्या वर्षात प्रवेश होत आहे. वाचकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे ‘दिव्य मराठी’ने ज्ञानाच्या क्षेत्रात अग्रणी ठेवणारा मजकूर यात देण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा यात समावेश केला आहे. त्यांच्या चौकटीबाहेरच्या कर्तृत्वाने वाचकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. यात दोन लहान मुले, दोन ज्येष्ठ आणि एका तरुणाचा समावेश आहे.
नऊ वर्षांच्या मुलीने मुलांसाठी बनवले अॅप

अन्विता विजय । विद्यार्थिनी
आपण मोबाइल अॅप निर्माण करावे, अशी अन्विताची अनेक दिवसांपासून इच्छा होती. तिने यासाठी पिगी बँकेत ९१०० रुपये जमवले. एखाद्या डेव्हलपरकडून अॅप बनवून घेण्याइतके पैसे आपल्याकडे नाहीत याची जाणीव तिला होती. नंतर तिने यू ट्यूबवर फ्री कोडिंग ट्युटोरिअल्स शोधणे सुरू केले. वर्षभर हाच उपक्रम सुरू होता. दोन वर्षांपासून तिचे अॅप बनवण्याचे स्वप्न तिला शांत बसू देत नव्हते. तिने कोडिंग शिकले. अॅपलने डेव्हलपरच्या वार्षिक परिषदेचे तिला निमंत्रण पाठवले. तिथे उपस्थित डेव्हलपर्सपैकी ती सर्वात लहान होती. इतरांचे अॅप परिषदेत स्वीकारले गेले. या वार्षिक परिषदेला अॅपल जगभरातील डेव्हलपर्सना बोलावते. ३५० पैकी १२० विजेत्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. मुलांना शिक्षित करणारे अॅप तिने विकसित केले. अन्विताला एक छोटी बहीण असून ती नुकतीच बोलणे शिकत आहे. पशुपक्ष्यांची आेळख ती शिकत आहे. तिची ही प्रक्रिया पाहूनच अन्विताने अॅपची निर्मिती केली. तिच्या अॅपमध्ये १०० विविध पशुपक्षी आहेत. त्यात त्यांची नावे आहेत. नाव येताच त्यांचे आवाज कानी पडतात. अशाच प्रकारचे दुसरे अॅप अन्विताने बनवले असून त्याद्वारे रंगांची आेळख होते.
पुढे वाचा... दोन महिन्यांपर्यंत होता कोमात, आता तीन पदके , अभियंता पिता डॉक्टर आईचा बुद्धिमान मुलगा , लेखनकार्यात व्यग्र असल्याने संसाराकडे दुर्लक्ष , लेखनकार्यात व्यग्र असल्याने संसाराकडे दुर्लक्ष