आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी जन्मली, लक्ष्मी आली; कंपनीत पहिली मोठी गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन भारतीय स्टार्टअप कंपन्या १ अब्ज डॉलर व्हॅल्युएशन क्लबमध्ये सामील झाल्या आहेत. एक आहे पेटीएम, दुसरी आहे जोमेटो डॉट कॉम. या कंपन्यांचे संस्थापक शिक्षकांची मुले आहेत. कुटुंबीयांनी त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला विरोध केला होता. अलिबाबाने फंडिंग केलेली पेटीएम पहिली भारतीय स्टार्टअप तर जोमेटो जगभरातील रेस्तराँची माहिती देणारी वेबसाइट आहे.
नाव- दीपेंदर गोयल, वय- ३३ वर्षे
वडील- जीवशास्त्राचे शिक्षक, आई- इंग्रजीच्या शिक्षिका, एक मोठा भाऊ
शिक्षण- आयआयटी दिल्लीतून पदवी
कुटुंब- पत्नी कंचन(प्रोफेसर) मुली सियारा २ वर्षांची
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑक्टोबर संपत आला होता. कंचनला रात्री उशिरा प्रसवकळा सुरू झाल्यानंतर दीपेंदर गुडगावमधून सकाळी मॅक्स हॉस्पिटलला पोहोचले. दुपारी या दांपत्याच्या पोटी सियाराने जन्म घेतला. या गोड बातमीनंतरच दीपेंदर यांनी आपला मोबाइल सुरू केला. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांनी सुरू केलेल्या जोमेटो कंपनीशी मोठा करार होणार होता. यातून कमाई पण भरपूर होती. सुरुवातीस ४ कोटी रुपये मिळवणाऱ्या कंपनीच्या मालकाला इकडे कन्यारत्न झाले, दुसरीकडे करारामुळे २०० कोटी मिळाले. २००० ते २००५ दरम्यान आयआयटी दिल्लीत शिकलेले दीपेंदर २००६ मध्ये सीनियर असोसिएट कन्सल्टंट म्हणून बेन अँड कंपनीमध्ये रुजू झाले. लहानपणी ते कधीच टॉपर नव्हते. सहावीत तर ते नापास झाले होते. आठवीत एका शिक्षकाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आणि ते अव्वल ठरले. यातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. मात्र, अकरावीत पुन्हा अपयश आले. नंतर आयआयटी एंट्रन्स उत्तीर्ण करून आयआयटी दिल्लीत प्रवेश घेतला. शिकत असताना नाष्टा,जेवणासाठी हॉटेलबाहेर मोठ्या रांगा असायच्या. मेन्यू वाचण्यात आणि अन्य गोष्टीत वेळ वाया जात असल्याचे लक्षात आल्यावर वेबसाइटचा विचार त्यांच्या मनात आला. यामध्ये रेस्तराँच्या काँटॅक्ट डिटेल्ससह मेन्यूही यात असावेत, अशी कल्पना होती. मात्र हे पूर्णवेळ काम होते. आई-वडील तयार नव्हते पण आयआयटी दिल्लीत शिकलेली पत्नी कंचनने त्यांना प्रोत्साहन दिले. आयआयटीयन दीपेंदरसाठी वेबसाइट तयार करणे मोठी बाब नव्हती. सुरुवातीला केवळ दिल्ली आणि एनसीआरच्या रेस्तराँची यादी करण्यात आली. याच पद्धतीने २००८ मध्ये फुडी बे डॉट कॉम नावाने कंपनी सुरू केली. त्यानंतर देशातील १२ शहरे जोडली. संपूर्ण देश जोडला गेल्यानंतर आता जगातील २३ देशांमध्ये याची सेवा घेतली जात आहे. नोव्हेंबर २०१० नंतर वेबसाईटचे जोमेटो असे नामकरण करण्यात आले. इंग्लिश, तुर्की, पोर्तुगाल, इंडोनेशियन, स्पॅनिश, झेक आणि स्लोवाक भाषांमध्येही ही वेबसाइट आहे.

आता पहाटे ३.०० पासून कॉल सुरू होतात. स्मार्टफोन अॅपवरही याची माहिती दिली जाते. सर्वात अगोदर फुडी बे डॉट काॅममध्ये इन्फो एजने(इंडिया) ४.७ कोटी रुपये गुंतवले. यानंतर पुढील वर्षी कंपनीने आपली गुंतवणूक तीनपट वाढवली. मात्र, सियाराच्या जन्मानंतर "लक्ष्मी' प्रसन्न झाली. सिक्वा कॅपिटल आणि इंफो एजने यामध्ये जवळपास सव्वादोन कोटी रुपये गंुतवले. याच्या जोरावरच कंपनीने पुढील सहा महिन्यांत न्यूझीलंडची मॅन्यू मीनिया खरेदी केली. यानंतर पूर्ण युरोपमध्ये कंपनीने सर्वात मोठ्या रेस्तराँ सर्च कंपन्या समजल्या जाणाऱ्या कंपन्यांची खरेदी केली.