Home | Divya Marathi Special | story about ambedkar followers abroad organisation

जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांचे विदेशातील संघटन

रवींद्र डोंगरे | Update - Apr 12, 2017, 04:28 PM IST

भारतातील दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'विश्‍वरत्‍न' म्‍हणून संबोधतो. कारण त्‍यांचे कार्य देशापुरतेच मर्यादित नसून जगातील अनेक देशांमध्‍ये त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाला सलाम करण्‍यात आला आहे. जगप्रसिध्‍द ऑक्‍सफर्ड, कोलंबिया आणि केंब्रिज विद्यापीठांनी त्‍यांचा सन्‍मान केला. आज त्‍यांचा विचार घेऊन अनेक संस्‍था-संघटना विदेशातही दीन-दलितांच्‍या उध्‍दारासाठी कार्य करत �

 • story about ambedkar followers abroad organisation
  भारतातील दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'विश्‍वरत्‍न' म्‍हणून संबोधतो. कारण त्‍यांचे कार्य देशापुरतेच मर्यादित नसून जगातील अनेक देशांमध्‍ये त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाला सलाम करण्‍यात आला आहे. जगप्रसिध्‍द ऑक्‍सफर्ड, कोलंबिया आणि केंब्रिज विद्यापीठांनी त्‍यांचा सन्‍मान केला.
  आज त्‍यांचा विचार घेऊन अनेक संस्‍था-संघटना विदेशातही दीन-दलितांच्‍या उध्‍दारासाठी कार्य करत आहेत. जाणून घेऊया विदेशातील बाबासाहेबांच्‍या अनुयायांचे कार्य.
  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बाबासाहेबांच्‍या अनुयायांनी विदेशात स्‍थापन केलेल्‍या संघटनांविषयी...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • story about ambedkar followers abroad organisation
  जपानमधील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था 
  जपानमधील टोयोटा शहरामध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एज्‍युकेशन' (बीएआयएई) ही संस्‍था स्‍थापन केली. दलित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्‍मक शिक्षण मिळवून देणे हा संस्‍थेचा उद्देश आहे. 11 एप्रिल 2003 मध्‍ये संस्‍थेची स्‍थापना झाली. संस्‍थेने नागपूरच्‍या रोहित कुंभारे या विद्यार्थ्‍याला आयआयटीमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आर्थिक मदत केली. 
   
   
   
   
   
   
   
   
   
 • story about ambedkar followers abroad organisation
  डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन 
  23 एप्रिल, 1994 रोजी या संस्‍थेची मलेशियातील क्‍वालालंपूर येथे स्‍थापना करण्‍यात आली. अनिवासी बहुजन भारतीयांच्‍या हक्‍कांसाठी संस्‍थेतर्फे जनजागृती केली जाते. तसेच विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून थेट मदतही दिली जाते. अमेरिका, कॅनडा, फ्रान्‍स, इंग्‍लंड, जर्मनी, कुवेत, संयुक्‍त अरब अमिरात, भारत, कोरिया, जपान, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्‍ट्रेलिया येथे ही संस्‍था काम करते. 
 • story about ambedkar followers abroad organisation
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका 
  दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला 10 लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले. ऑनलाइन करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे भारतामध्‍ये राबवले जातात. मानखुर्द, नवी मुंबई येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. 
 • story about ambedkar followers abroad organisation
  इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स, अमेरिका 
  दलितांच्‍या मानवी हक्‍कासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी.सागर यांनी 21 मार्च 2006 रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्‍टन येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. लंडन ये‍थे दलित चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते. 
   
 • story about ambedkar followers abroad organisation
  समता फाउंडेशन, नेपाळ
  2009 मध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या या संस्‍थेतर्फे दलितांच्‍या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये समानता आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत. 
 • story about ambedkar followers abroad organisation
  आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर 
  दलित समाजातील वंचित घटकांना शिक्षण, आर्थिक मदत करणे आणि त्‍यांना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने अमेरिकेतील बाबासाहेबांच्‍या अनुयायांनी 'आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर' ही संस्‍था स्‍थापन केली. एकूण 11 कार्यकारी संचालक असलेल्‍या या संस्‍थेच्‍या कार्यकारी समितीचे अध्‍यक्ष जगदीश बनकर आहेत. 
 • story about ambedkar followers abroad organisation
  आंबेडकरटाइम्‍स डॉट कॉम 
  www.ambedkartimes.com हे संकेतस्‍थळ अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरु करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ बाबासाहेबांच्‍या विचारांना समर्पित आहे. 
 • story about ambedkar followers abroad organisation
  आंबेडकर भवन, न्‍यू जर्सी 
  अमेरिकेतील न्‍यू जर्सी येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांचे जावई मिलिंद अवचरमोल यांनी डॉ. बाबासाहेब आं‍बेडकरांचे विचार रुजवले आहेत. येथे त्‍यांनी आंबेडकर भवनाची स्‍थापना केली आहे. अमेरिकेत येणाऱ्या भारतीय अनुयायांची या भवनात राहण्‍याची आणि जेवणाची सोय केली जाते.   
 • story about ambedkar followers abroad organisation
  ...आणि बाबांची माफी मागितली 
  इंग्‍लंडवरुन भारतात डॉ. वेलबीचे एक कमिशन आले होते. या कमिशनने रुपयाच्‍या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थशास्‍त्रज्ञांना निमंत्रित केले होते. त्‍यांनी विनिमयाच्‍या दराबद्दल आपापली मते मांडली. शेवटचे मत डॉ. बाबासाहेब मांडणार होते. इतक्‍यात डॉ. वेलबी बाबासाहेबांना म्‍हणाले, आंबेडकर, मी जगातील प्रसिध्‍द विद्वान अर्थशास्‍त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकले आहेत. तेव्‍हा आपले मत मला ऐकण्‍याची आवश्‍यकता वाटत नाही. यावर बाबासाहेब नम्रपणे म्‍हणाले, 'डॉ.वेलबी, आपण ज्‍या विद्वान व प्रसिध्‍द अर्थशास्‍त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकले आहेत व त्‍यांनी ज्‍या पुस्‍तकातील संदर्भ सांगितले, त्‍या पुस्‍तकांचा मी लेखक आहे. त्‍या पुस्‍ताकांतील काही भाग लिहिणे अजून बाकी आहे, तो मीच पूर्ण करु शकतो.' हे ऐकून डॉ. वेलबी यांनी बाबासाहेबांच्‍या हातात हात घालून माफी मागितली. 

Trending