आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग बदलणा-या कंपन्या-एनवायएसईच्या यादीत पहिली हॉटेल कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्थापक: कोनराड एन हिल्टन
मुख्यालय: बेवर्ली हिल्स, कॅलिफोर्निया
स्थापना: 1919
उत्पन्न: 9.7 अरब डॉलर (2013)

पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रान्स मोहिमेहून परतल्यानंतर कोनराड हिल्टन यांना बँक खरेदी करायची होती. व्यवसायात त्यांना रुची होती. वयाच्या २१ व्या वर्षीच पित्याच्या जनरल स्टोअर्सची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. राजकारणही त्यांना आवडे. न्यू मेक्सिको भागाचे ते सदस्य होते. आर्थिक जगतावरही त्यांचे बारीक लक्ष असे. महायुद्धापूर्वी या जगताशीही त्यांचा संबंध आला होता. बँक खरेदी करून आर्थिक मनसुबे तडीस न्यायचा हिल्टन यांचा मानस होता. मात्र हे घडू शकले नाही. त्यांनी सिस्को, टेक्सॉसमध्येच ५० खोल्यांचे हॉटेल द मोबले खरेदी केले. अचानक घेतलेल्या या निर्णयानेच पुढे हिल्टन हॉटेल कॉर्पोरेशन कंपनीचा जन्म झाला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या (एनवायएसइ) यादीत सर्वप्रथम कंपनीने जागा पटकावली.
कोनराड यांना हॉटेल व्यवसाय खूपच भावला. त्यातूनच काही महिन्यानंतर त्यांनी दुसरे हॉटेल खरेदी केले. त्यानंतर हा सिलसिलाच जणू निर्माण झाला. तीन वर्षात त्यांनी पाच हॉटेलची खरेदी केली. १९२५ त्यांनी पहिल्या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे नाव होते- हिल्टन.
१९३० च्या आधीच टेक्सॉसचे बडे हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. मात्र आर्थिक मंदीने व्यवसायाचे कंबरडेच मोडले. कोनराड यांनी काही हॉटेल विकले. नोकरदार वर्ग कमी केला. तरीही काही फरक पडला नाही. शेवटी स्वत: एका हॉटेलात नोकरी पत्करली. मंदी संपेपर्यंत प्रतीक्षा केली. १९३८ मध्ये हिल्टन यांनी पहिल्यांदाच टेक्सॉस बाहेर पाऊल टाकले. सॅन फ्रान्सिस्कोत दोन हॉटेल खरेदी केले. पुन्हा १९४३ मध्ये न्यूयॉर्क सिटीत दोन मोठे हॉटेल विकत
घेतले. हिल्टन कंपनी आता अमेरिकेत पहिली कोस्ट-टू-कोस्ट हॉटेल साखळी चालवत होती. मात्र कोनराड इथेच थांबले नाहीत. १९४५ मध्ये शिकागोत पामर हाऊस खरेदी केले. त्यावेळी जगातील सर्वात मोठे हॉटेल अशी त्याची ख्याती होती. १९४७ साली कंपनीला हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशनच्या रूपात न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये समाविष्ट केले.
या मोठ्या यशानंतर त्यांनी युरोप, मेक्सिको, प्यूर्टो रिकोसारख्या ठिकाणी आपल्या कंपनीचे हॉटेल सुरू केले. लग्झरी ऑफर्स, हॉटेल गिफ्ट शॉप, क्रेडिट कार्ड सिस्टीमसारख्या अनोख्या सुविधा दिल्या. १९५९ मध्ये विमान प्रवास करणा-यांसाठी सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट बनवले.
हिल्टन यांनी १९६० च्या दशकात हॉटेल उद्योगात फ्रेंचाइजीची सुरुवात केली. १९६७ मध्ये कंपनीने हिल्टन इंटरनॅशनल एका ब्रिटिश कंपनीला विकले. कारण होते स्वदेशात बस्तान बसवण्याचे. कॅसिनो व्यवसायात त्यांनी पाय रोवले. १९७३ मध्ये ऑनलाइन रिझर्वेशन नेटवर्क सुरू केले. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंपनीने आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात पकड घट्ट केली होती. १९९७ मध्ये हिल्टन इंटरनॅशनलशी त्यांची भागीदारी झाली. २००५ मध्ये ते पुन्हा खरेदी केले. १९९९ मध्ये प्रॉमस हॉटेल कार्पोरेशनच्या खरेदीनंतर कंपनीने जवळपास ५० देशांत जाळे पेरले होते.