आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत बाप्पाचे : गणरायाच्या स्थापनेसाठी करा आकर्षक आरास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेशाच्या आगमनाने सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. या गणेशाच्या स्वागतासाठी घराघरांमध्ये जय्यत तयारी सुरू असते. घरातील अबालवृद्ध गणरायासाठी आरास करण्यात मग्न असतात. आरास करण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. पण मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याने बाजारपेठेत पर्यावरणपूरक साहित्याचेच प्रमाण अधिक आहे.
बाप्पाच्या डेकोरेशनसाठी बाजारात अनेक प्रकारचे रेडी मटेरियल उपलब्ध आहे. त्यात विविध प्रकारच्या आकर्षक मखरांचाही समावेश आहे. त्याचबरोबर विविध थीमवर आधारित असे डेकोरेशनचे साहित्यही देण्यात येत आहे. घरगुती श्रीगणेशासाठी लहान आकारातील फोल्डींगची मंदिरेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्वांच्या मदतीने अत्यंत आकर्षक अशा पद्धतीने घरगुती गणेशाची सजावट करता येईल.
पुढील स्लाइ़ड्सद्वारे जाणून घ्या विविध पद्धतीने गणेशाची आरास कशी करावी....