आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Story About Great Maratha Warrior Tanaji Malusare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\"आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं\" अशी गर्जना करणाऱ्या तानाजींचा आज स्‍मृतीदिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेले वाक्य सर्वांच्याच परिचयाचे आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तानाजींचा काल (4 फेब्रुवारी 1670) स्‍मृतीदिन आहे. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवराय हळहळले होते आणि ‘गड आला पण सिंह’ गेला असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजींना राज्‍यांनी सिंहाची उपमा दिली होती.
तानाजी मालुसरे यांच्‍या स्‍मृतीदिनी Divyamarathi.com आपणास तानाजींच्‍या काही खास आठवणी सांगणार आहोत...
शिवाजी राज्‍यांचे बालपणीचे सवंगडी
छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींंमध्ये महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मुलाचे लग्‍न सोडून गेले लढाईवर...आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."