आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांची शिल्‍पे घडवणारी माडिलगेकरांची चौथी पिढी, शिल्‍पकलेला बाबासाहेबांचा परिस स्पर्श

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबासाहेबांसोबत राजाराम माडिलगेक‍र. - Divya Marathi
बाबासाहेबांसोबत राजाराम माडिलगेक‍र.
औरंगाबाद - थोर व्यक्तींचे दर्शन घडतांना त्यांचे चरित्र व शिकवण सदैव स्मरणात रहावी, यासाठी जगभर त्यांचे पुतळे उभारले जातात. परंतू पुतळ्याचा माध्यमातून थोरांचा संदेश समाजापर्यंत पोहचवणाऱ्या शिल्पकाराचे नाव मात्र दुर्लक्षीतच राहते.
 
गेल्या तील पिढ्यांपासून बाबासाहेबांचे पुतळे तयार करणारे शिल्पकाराचे माडिलगेकर कुटूंब औरंगाबादेत राहतेय. त्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांचा सहवास लाभलाय. यामुळे बाबासाहेबांची शिल्पे साकारतांना त्यातील बारकावे, हावभाव, लकब, धीरगंभीरपणा पुतळ्यात जसेच्या तसे उमटतो. बाबासाहेबांवरील श्रद्धेमुळे निपाणी ते औरंगाबाद असा प्रवास करत त्यांनी या महामानवाचे पाचशेच्या वर पुतळे तयार केले आहेत.
 
माडिलगेकर कुटूंब हे मूळ बेळगाव जिल्ह्यातील निपाणीचे. शिल्पकला, मूर्तीकाम हा त्यांचा वंशपंरपरागत व्यवसाय. बळवंत गोविंद माडिलगेकर (१८६१-१९४०) कोल्हापूर, बेळगाव, हुबळी या ठिकाणी मूर्तीकाम करत. त्यांचे मुख्य काम हे मंदीरातील देवाच्या मूर्ती, गणेश मूर्ती इथपर्यंत मर्यादीत होते. त्यांचे चिरंजीव राजाराम बळवंत माडिलगेकर (१९०५-१९८३) यांनी वडलांच्या पारंपारीक कामात वेगळेपण आणत व्यक्तीशिल्पे साकारण्यास सुरूवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बालगंधर्व, शाहू महाराज यांची शिल्पे साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. तिसऱ्या पिढीतील सुरेश राजाराम माडिलगेकर आणि दिवंगत सुभाष यांनी ही परंपरा केवळ टिकवलीच नाही तर यात आधुनिकतेची भर टाकली. याकाळात हा व्यवसाय राज्याची बंधने ओलांडत देशभरात विस्तारीत झाला. तर चौथ्या पिढीतील बलराज सुरेश माडिलगेकर १५० वर्षांच्या या परंपरेला तंत्रज्ञानाची साथ देण्यास सज्ज झाला आहे.
 
मिरवणूकीमुळे बाबासाहेबांचे आकर्षण
एप्रिल १९५० मध्ये राजाराम माडिलगेकर यांच्या पत्नी रूग्णालयात अॅडमीट होत्या. त्यांचे चिरंजीव चिमुकले सुभाष यांनी आईला भेटण्याचा हट्ट धरला. त्याचे मन वळवण्यासाठी वडील त्यास रस्त्यावर घेऊन गेले. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाची मिरवणूक सुरू होती. एका वाहनावर बाबासाहेबांचे छायाचित्र लावून घोषणा दिल्या जात होत्या.
 
याचे त्यांना कमालीचे अाकर्षण वाटले. ज्या व्यक्तीचा एवढा जयजयकार होतो, ती किती महान असेल? असा प्रश्न पडला. त्यांनी बाबासाहेबांना भेटण्याचे ठरवले. निपाणीतील तंबाकू व्यापारी बळवंत वराळे बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते. राजाराम यांनी त्यांची इच्छा बाेलून दाखवली. त्यांनी जुलैमध्ये दिल्लीत बाबासाहेबांकडे जाणार असल्याचे सांगीतले. ही संधी साधण्याचे त्यांनी निश्चित केले. १५ एप्रिल रोजी त्यांचे दुसरे चिरंजीव सुरेश यांचा जन्म झाला.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- बाबासाहेबांच्या भेटीसाठी मंगळसूत्र विकले
- पुतळ्यासाठी बाबासाहेबांचा नकार
- देशभरात बाबासाहेब
- थोरवी बाबासाहेबांची
 
हे पण वाचा,
 
 
 
 
 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...