आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या कंपनीत त्रुटी शाेधण्यापेक्षा चांगले शाेधण्याचे मॅगचे धाेरण हाेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅग व्हिटमॅनयांना अाॅनलाइन अाॅक्शन साइट ईबेमुळे अाेळखले जाते. ईबेचा ५.७ दक्षलक्ष डाॅलरचा महसूल दक्षलक्ष डाॅलरपर्यंत त्यांनी पाेहोचवला. १९९७ ते २००८ पर्यंत त्या ईबेमध्ये कार्यरत हाेत्या. जेव्हा त्यांनी या कंपनीत काम सुरू केले, तेव्हा मात्र ३० कर्मचारी हाेते. जेव्हा १० वर्षांनंतर त्यांनी कंपनी साेडली, तेव्हा त्याची संख्या १५ हजार झाली हाेती. यापूर्वी त्या हसब्रो अाणि वाॅल्ट डिज्नीमध्ये एक्झिक्युटिव्ह हाेत्या.

स्टेनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधील एका मुलाखतीत मॅग यांनी वेगवेगळ्या कंपन्यात काम करण्याच्या अापल्या पद्धतीबद्दल सांगितले हाेते. त्या म्हणतात, जेव्हा काेणी दुसऱ्या कंपनीतून येताे, तेव्हा सर्वात अाधी त्रुटी शाेधण्याचे काम करताे. काय गाेंधळ सुरू अाहे, हे पाहताे. परंतु, मी त्याच्याविरुद्ध कामाची पद्धत सुरू केली. कंपनीत काय चांगले हाेत अाहे, हे शाेधत हाेते. यामुळे तुम्हाला काय बदलण्याची गरज नाही, हे समजून जाते. हा प्रयाेग कंपनीच्या सेल्सवर लागू हाेताेच, पण त्याला वर्क कल्चरच्या बाबतीतही अमलात अाणायला हवे. जर तुम्ही फक्त काय चुकीचे हाेत अाहे, हे शाेधण्याचे काम कराल तर लाेकांच्या हृदय अाणि डाेक्यातून उतरून जाल. पण जर तुम्ही सकारात्मक सुरुवात कराल तर कर्मचारी तुमच्यासाेबत येण्याची शक्यता जास्त असते. बिझनेस अाणि नाेकरी बदलण्यासंदर्भात त्या म्हणतात, जर काेणी नवीन बिझनेसमध्ये अनुभव नाही, म्हणून जाण्याचा प्रयत्न करणार नाही, तर हे याेग्य नाही. याला फक्त कारणे देणेच म्हणता येईल. सर्वत्र मूळ सिद्धांत एकच अाहे, मग ते प्राॅक्टर अॅण्ड गेम्बल असाे की, टि‌्वटर, एचपी किंवा एखादी बँक असाे.

व्हिटमॅन यांचा जन्म १९५६मध्ये न्यूयाॅर्कमधील लाॅन्स अायलँडमध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या अाई-वडील दाेघांनी काम केले. त्यांची अाई माग्रेर्ट व्हिटमॅन रेडक्रॉस संस्थेत एरोप्लेन अाणि ट्रक मॅकेनिक हाेत्या. जेव्हा मॅगचा जन्म झाला, तेव्हा त्या डिसप्लासियाने अाजारी हाेत्या. तीन वर्षांच्या वयापर्यंत त्यांना अाधार घेऊन चालावे लागत हाेते. परंतु, नंतर जेव्हा अाधारशिवाय चालू लागली तेव्हा चांगल्या पद्धतीने चालणे अाणि धावताही येऊ लागले हाेते. १९७४मध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून प्रिंसटन विद्यापीठात प्रवेश घेतला. येथून पदवी घेतल्यावर हार्वर्ड विद्यापीठात एमबीए केले. १९७९ मध्ये ‘पी अॅण्ड जी’ पासून अापले करिअर त्यांनी सुरू केले. प्रशिक्षणादरम्यान समजले की, कंपनी महिला कर्मचाऱ्यांना क्रेडिट कार्ड देत नाही.

मॅग व्हिटमॅन
मॅगव्हिटमॅन एचपी इंटरप्राइज बिझनेस टेक फर्मला पुन्हा ऑर्गनाइज करत अाहे. त्यांनी २०११मध्ये कंपनीचे सीईओपद सांभाळले हाेते. नाेव्हेंबर २०१५मध्ये एचपी इंकपासून वेगळ्या झाल्यावर त्या एचपीमध्ये सीईअाे झाल्या. एचपी इंटरप्राइजला सर्व्हिस, सॉफ्टवेअर, स्टोरेज हार्डवेअर सेलिंगमध्येच त्यांना फाेकस करायचा हाेता.
बातम्या आणखी आहेत...