आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त- पूनम भगत- धनाढ्य मायलेकींनी परस्परांना दाखवली न्यायालयाची वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरलॉन समूहाचे मनोहर भगत आणि रजनी भगत यांना दोन मुली आहेत. शीतल आणि पूनम भगत. दोघींचे विवाह मोठ्या कटुंबात झाले. शीतलचा विवाह मफतलाल समूहाच्या अतुल्य यांच्याशी झाला. पूनमचा विवाह युनायटेड फॉस्फोरसचे मालक जय श्रॉफ यांच्याशी झाला. जयसोबत पूनमचे वाद फार पूर्वीपासून आहेत. तिने आरोप केला होता की तिची १५० कोटी रुपयांची ज्वेलरी जयच्या घरातून गायब झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला. पूनमने खोटी तक्रार दिल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

पूनम आपल्याविरुद्ध कोणा बंगाली बाबाच्या काळ्या जादूचा प्रयोग करत असल्याचा आरोप जयने केला होता. त्याने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.

हे संपूर्ण प्रकरण मुंबईच्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पाली हिलमध्ये सुरू आहे. यावर्षी २२ जून रोजी पूनम जयच्या घरी गेली. घरी पोहाेचताच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याचे फर्मान तिने काढले. १५ मिनिटांत ती आपल्या मुलींना घेऊन तिथून निघून गेली. बाहेर पडताच तिचा एका फोटोग्राफर सोबत वाद झाला. पुन्हा ती जयच्या घरात परतली. आपली बॅग विसरल्याचे ती सांगत होती. तिथून निघाल्यानंतर तिने आपली ३.५ कोटींची ज्वेलरी गायब असल्याचा आरोप केला. एक आठवड्यानंतर तिच ज्वेलरी १५० कोटींची झाली. तिने यासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदवली.

मॅजिस्ट्रेटच्या आदेशाने एफआयआर नोंदवली गेली. या प्रकरणी तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कॅमेरे सुरू होते तर काही बंद. नोकरांनी मोबाइलहून रेकॉर्डिंग केले. जी बॅग पडल्याचे सांगण्यात आले होते ती बॅग गार्डपाशी पाडली गेल्याचे दिसून आले. हे रेकॉर्ड झाले होते. याच वेळी पूनमचे छायाचित्रकाराशी वाद झाले.

तिची बहीण शीतलने ५० लाख रुपयांचे दागिने कस्टम ड्यूटीविना आणले होते. यासाठी शीतलला भायखळा जेलमध्ये एक दिवस ठेवले होते. दोघी बहिणीत बेबनाव आहे. २२ जूनच्या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये पूनमची आई रजनी भगत यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की त्यांची मुलगी शीतल जबरदस्ती त्यांच्या घरात घुसली. तिच्यासोबत बाउन्सर होते. यानंतर पूनमने आपल्या बहिणीला एका खोलीत कोंडले होते असेही सांगितले जाते. तिघी मायलेकी परस्परांविरुद्ध कोर्टकज्जात गुंतल्या आहेत.

पूनमच्या आईने मोठी मुलगी शीतलविरुद्ध पोलिसांत जबरदस्ती घरात घुसल्या प्रकरणी तक्रार नोंदवली.
बातम्या आणखी आहेत...