आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड बँकेत करत होती नोकरी, आज 100 पेक्षा अधिक खासदारांचे पाहते काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितविका भट्टाचार्य - Divya Marathi
रितविका भट्टाचार्य
दिल्ली - स्मृती इराणी, हिना गावित, कमलनाथ, दिनेश त्रिवेदी, पूनम महाजन यासह इतर 100 खासदारांचे विकासकार्य कोणी एकच व्यक्ती पाहू शकते का? कदाचित याचे उत्तर नकारार्थीही येईल. मात्र, एक तरुणी हे काम करत आहे. रितविका भट्टाचार्य. केरळ प्रांतात स्वच्छ पाणी कसे उपलब्ध होईल, हिमाचलमधील अभ्यासक्रमात सुधारणा कशा करता येतील यासाठी रितविकाचा चमू काम करतो.

रितविका १२ वर्षांची होती तेव्हाची गोष्ट आहे. तिचे वडील राजकीय नेते होते. एक दिवस त्यांच्या घरी मनीष तिवारी (काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री) आले. तिने तिवारींना सांगितले की आपल्यालाही नेत्यांसह काम करायचे आहे. तिवारी हे ऐकून हसले व तिला म्हणाले, आधी शिक्षण पूर्ण कर. आज हीच मुलगी १०० पेक्षा अधिक राजकीय नेत्यांच्या विकासकार्यांची देखरेख करत आहे. हार्वर्डमध्ये शिकत असताना अमेरिकन सिनेटर कॅथरीन हॅरिस यांच्या मतदारसंघात तिने विकासकार्य केले.

२००९ मधील किस्सा आहे. १५ व्या लोकसभा निवडणुका होत्या. एक नवी सुरुवात केली. या निवडणुकांत अनेक युवांना तिकीट मिळाले होते. ते संसदेत जातील. मात्र,ते विकासकार्य कसे करतील, असा प्रश्न तिला पडला. त्या वेळी २२ वर्षीय रितविकाने ‘स्वनीती’ नामक स्वयंसेवी संस्था स्थापन केली. संसद सदस्यांना विकासकामांची आेळख करून देण्याचे काम ही संस्था करते. शिवाय सुरू असलेल्या विकासकामांची स्थिती काय आहे याची माहितीही दिली जाते. दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्री झाले. त्यांच्या संसदीय क्षेत्रातील ज्यूटच्या गिरण्यांत अनेक मजूर श्वसनविकारांनी त्रस्त होते. बॅरकपूर क्षेत्रात ही समस्या सार्वत्रिक होती. जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील ही समस्या होती. त्रिवेदींनी हे काम रितविकाकडे सोपवले. रितविकाने आपल्या चमूच्या लोकांना संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी पाठवले. त्यांनी मजुरांच्या कामाची पाहणी केली. मास्क लावणे व मशीनपासून थोडे दूर राहून काम करणे गरजेचे होते. रितविकाने हे सुचवले. सर्व ज्यूट गिरण्यांमध्ये यासंबंधी पोस्टर लावून मजुरांना जागरूक करण्यात आले. त्यांच्या चमूने अनेक उपाय सुचवले. त्यामुळे ही समस्या बऱ्याच अंशी कमी झाली. अशा पद्धतीने विविध कामे रितविका आपल्या चमूसोबत करते.
> वय- २८
> पालक-रंजन भट्टाचार्य, उमा
> शिक्षण- स्प्रिंगहील्स स्कूल, हार्वर्डमधून पदवी
> कुटुंब- पती शांतनी (आयआयटी रुरकी) व्हेंचर कॅपिटलिस्ट
> चर्चेत का ? शंभरपेक्षा अधिक खासदारांच्या विकासकामांची देखरेख.
(त्यांनी अमेरिकेहून फोनवर ‘दिव्य मराठी’ला दिलेली माहिती. )
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रितविका यांचे फोटोज