आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधी यांचे पत्र मिळाले अन् सोनिया गांधींच्‍या आईची चिंता मिटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुलै २०१० मध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे तेव्हा भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा कॅमेरून यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीचे नियोजनही झाले होते. पण, सोनिया, प्रियंका व राहुल गांधी त्यांना न भेटताच अचानक विदेशी निघून गेले. ते विदेशी नेमके का गेले याचे कारण कुणालाच माहीत नव्हते. सगळीकडे नुसते अंदाज बांधले जात होते. मात्र,  काही दिवसांनी हे माहित पडले की, सोनिया गांधी यांच्या आई पावलो यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अचानक तुरिनच्या ओबेसेनोला जावे लागले होते. पावलो यांचे पती स्टिफनो मायनो हे दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरकडून रशियन लष्कराविरोधात लढले होते. महायुद्धानंतर स्टिफनो मायदेशी परतले आणि त्यानंतर सोनिया यांचा जन्म झाला. स्टिफनो मुसोलिनी यांचे समर्थक मानले जायचे.
 
महायुद्धाहून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी तुरिनमध्येच बांधकामाशी संबंधीत एक व्यवसाय सुरू केला. दरम्यान, ते राजकारणातही सक्रिय होते. त्यांनी इटलीमधील नॅशनल फॅसिस्ट पार्टीसाठी काम केले. १९८८ मध्ये स्टिफनो यांचे निधन झाले. निधनानंतर पावलो मायनो हे तीन मुलींसह इटलीतच राहू लागल्या. त्यांनी तीनही मुलींचे उत्तम संगोपन तर केलेच शिवाय त्यांना महत्वकांक्षीही बनवले.
 
पावलो आणि त्यांच्या दोन मुली अजूनही तुरिनजवळील ओरबेसानोमध्ये राहतात. इटलीतील सुमारे ९० टक्के कुटुंबीय कॅथलिक प्रथा परंपरा मानतात. देशातील ९० टक्के कुटुंबीयांप्रमाणेच मायनो कुटुंबीयही कॅथलिक परंपरा मानणारा आहे. या समाजात महिलांसाठी कडक नियम व प्रथा  आणि परंपरा होत्या. त्यांचे पावलो त्यावेळी प्रकर्षाने पालन करायच्या आणि आताही त्या या परंपरेनुसारच चालतात. सोनिया यांनी राजीव गांधी यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली तेव्हा पावलो खूप चिंतित झाल्या. मुलगी एका गावातून दुसऱ्या नव्हे तर एका देशातून थेट दुसऱ्या देशात कायमची वास्तव्यास जाणार होती, याची त्यांना काळजी वाटायची. सोनिया आणि राजीव गांधी यांचे लग्न झाल्यानंतर मुलगी ४ हजार मैल दूर कशी राहील, असे त्यांना वाटायचे. पण, इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या पत्राने त्यांची चिंता पळवून लावली आणि त्यांच्या मनातील भीतीच नाहीशी झाली.  ‘इतकी छान मुलगी मला दिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते’, असे इंदिरा गांधी यांनी पत्रात लिहिले होते. ‘मुलगी’ शब्दासोबतच त्यांनी सोनिया यांच्यासाठी ‘प्रिय फूल’ या इंग्रजी शब्दांचा पत्रात उल्लेख केला होता.
 
पावलो यांनी अजूनही ते पत्र सांभाळून ठेवले आहे. वास्तविक, सोनिया इंदिरा गांधींची खूप सेवा करायच्या. इंदिरा गांधी सभा संपवून उशिरा यायच्या तर सोनिया त्यांना हातपाय धुवायला गरम पाणी करून द्यायच्या. दुसऱ्या दिवशीसाठी कडक इस्त्री केलेली साडी आधीच तयार त्यांच्या खोलीत ठेवायच्या.
 
वय- ९३ वर्षे , पति- स्टिफेनो मायनो
कुुटुंबीय- तीन मुली- अनुष्का, सोनिया आणि नादिया  
चर्चेचे कारण- राहुल गांधी आजी पावलो यांच्याकडे वाढदिवस साजरा करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...