आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर रमण - ललित मोदींचे निकटवर्तीय श्रीनिंचा उजवा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : १९७१
कुटुंब : आई-वडील आणि दोन मोठे भाऊ चेन्नईत
शिक्षण : कोइंबतूरच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून अॅप्लाइड सायन्समध्ये पदवी आणि १९९३ मध्ये नरसी मोनजीमधून अॅडव्हर्टायझिंग अॅँड कम्युनिकेशन्समध्ये मॅनेजमेंट पदवी.
चर्चेत - नुकताच त्यांनी आयपीएलचा राजीनामा दिला.
सुंदर रमण यांची कथा रंजक आहे. त्यांचे आजोबा रेल्वेत टपालांची वर्गवारी करण्याचे काम करत होते. वडिलांचीही सामान्य नोकरी होती. प्रत्येकातून स्वत:साठी काहीतरी चांगले शोधले पाहिजे, अशी आजोबांची शिकवण होती. त्याचे अनुकरण त्यांनी मनोमन केले. मदुराईत जन्मलेले आणि त्रिचीमध्ये वाढलेले रमण पदवीनंतर आयआयएममध्ये अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे ते मुंबईत नरसी मोनजीमध्ये शिक्षणासाठी आले.

१९९५ मध्ये व्यवस्थापनाची पदवी घेतल्यानंतर ते हिंदुस्तान थॉमसन असोसिएटमध्ये रुजू झाले. काही दिवसांनंतर ते अॅड ग्रुप डब्ल्यूपीपी मीडिया एजन्सीच्या डिव्हिजन ग्रुप एममध्ये चांगल्या हुद्द्यावर पोहोचले. २००८ ची घटना आहे. एके दिवशी बीसीसीआयच्या बैठकीत ललित मोदी यांची भेट झाली. तेव्हा रमण ३६ वर्षांचे होते आणि ग्रुप एम कोणत्याही परिस्थितीत बीसीसीआयशी जोडला जावा, याच्या प्रयत्नात ते होते.

ललित मोदी यांची दुसऱ्यांदा एकट्यानेच भेट घेतली आणि काही प्रस्ताव दिले. ललित मोदींना ते आवडले. परिणामी, रमण आयपीएलचे सीईओ झाले. त्या वेळी त्यांना ललित मोदींचा "ब्रेन चाइल्ड' संबाेधले जाऊ लागले. मी काय करतोय ते आई-वडिलांना आता सांगू शकेन, असे रमण तेव्हा पहिल्यांदाच म्हणाले हेाते. अन्यथा दोघांना मीडिया प्लॅनिंग म्हणजे काय हे समजत नव्हते. २०१० मध्ये बीसीसीआयने मोदींवर बंदी लादली. मात्र, रमण पदावर कायम होते.

मोदींच्या गच्छंतीनंतर त्यांची आयपीएल आणि एन. श्रीनिवासन यांच्यामागे काम करणारा मेंदू अशी ओळख होऊ लागली. ललित मोदीनंतर श्रीनिवास यांचा उजवा हात म्हणून ते प्रसिद्ध झाले.
आयपीएलच्या फिक्सिंगमध्ये श्रीनिवासन यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कोणताही आरोप नव्हता. मात्र, न्या. मुद््गल समितीच्या अहवालात रमण यांनी एक सट्टेबाजाशी आठ वेळा संपर्क साधल्याचा उल्लेख होता. त्यांनी श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांच्याविषयी माहिती घेतली होती. त्यांना आयपीएलचा पॉलिसी मेकरशिवाय आयपीएलचा ऑक्सिजन सप्लायरही मानले जाते. रमण आयपीएलच्या प्रसारण व वितरकाच्या हक्काबाबत वाटाघाटी करत होते.

त्यांच्या टि्वटर फॉलोअर्सची संख्या १ लाख ७० हजार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी शशांक मनोहर यांनी बीसीसीआय प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला, त्याच दिवशी रमण यांच्या खिशात राजीनामा होता.