Home | Divya Marathi Special | Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

बाबासाहेबांनी घातली होती सविता यांना मागणी, असा झाला डॉ. आंबेडकरांचा दुसरा विवाह

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2016, 09:58 AM IST

नीकटवर्तीयांच्या आग्रहानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतला होता. त्याच्या या दुसऱ्या विवाहाची कथाही फार रंजक आहे.

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला. पण त्यांचे कौटुंबीक जीवन हे काहीसे त्रासदायकच राहिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई या क्षयाच्या दीर्घ आजाराने मरण पावल्या. त्याआधी बाबासाहेबांनी त्यांची चार मुलेही गमावली होती. या आघातांनी ते एकाकी पडले होते. त्यांची प्रकृतीही खालावत चालली होती. अखेरच नीकटवर्तीयांच्या आग्रहानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या दुसऱ्या विवाहाची कथाही फार रंजक आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते डॉ. सविता कबीर. दवाखान्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीच्या तपासणीदरम्यान त्यांची आंबेडकरांशी भेट झाली होती. त्यानंतर आंबेडकरांनीच डॉ. सविता यांना लग्नाविषयी विचारले होते. पण त्यामागे अनेक घडामोडी दडलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर यांच्या विवाहाची हीच कथा सांगणार आहोत.

  सूचना - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात या स्टोरीमध्ये मांडण्यात आलेली माहिती ही, 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या पुस्तकातून घेण्यात आली असून, त्याच्या लेखिका डॉ. बाबासेहब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर या आहेत.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, डॉ. बाबासाहेब आणि डॉ. सविता यांच्या भेटीची आणि विवाहाची संपूर्ण कथा..

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे 1935 साली प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. हा आंबेडकरांसाठी मोठा आघात होता. त्यात रमाबाईंच्या निधनाआधीच आंबेडकरांची तीन मुले आणि एक मुलगी दगावली होती. त्यामुळे या घटनांचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम होऊ लागला होता. ते विरक्त राहायला लागले होते. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ. एस राव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ. सविता यादेखिल  डॉ. राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि सविता मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी 1947 मध्ये सविता आणि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम भेट झाली होती. राव यांनी त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  या भेटीनंतर एकदिवस डॉ. आंबेडकर डॉ. सविता काम करत असलेल्या डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टींग रूमवर (दवाखाना) गेले होते. त्याठिकाणी त्यांची तपासणी झाली. त्यानंतर आंबेडकर जेव्हाही मुंबईला येत तेव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टींग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जायचे. डॉक्टरांनी मालवणकरांना अनेक पथ्ये आणि औषधाबाबत सूचना दिण्यात आल्या होत्या. पण डॉक्टर म्हणाले हे मला कसे जमणार, तेव्हा डॉ. सविता यांनी त्यांना एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ.आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेल, असा सल्ला दिला होता. डॉ. सविता यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नसावी. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  अशाच प्रकारे आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टींग रूमवर गेले तेव्हा डॉ. सविता त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगत होत्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू. त्यावेळी डॉ. सविता यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  त्यानंतर डॉ. सविता आणि बाबासाहेब यांची भटू होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ. आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते, असे डॉ. सविता स्पष्टपणे कबूल करतात. डॉ. सविता यांच्या मनात बाबासाहेंबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभुती होती. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  एकदा 1947 च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टींग रूमवर गेले होते. डॉक्टरांनी बाबासाहेबांना तपासले. त्यानंतर बाबासाहेब सविता यांना म्हणाले, चला मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे. त्यापूर्वीही अनेकदा बाबासाहेब आणि सविता एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांनी बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिक वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ. सविता यांना म्हणाले. माझे सहकारी मला सहचारिणी (लग्न) करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडीती, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ. सविता गप्पच राहिल्या. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  त्यानंतर डॉ. आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि सविताही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक सविता यांना एक पार्सल मिळाले. त्यात एका पत्रात लिहिलेले होते, मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात मी  तुझ्यापासूनच सुरू करीत आहे, अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयातील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिला तरी मला बिल्कुल दुःख होणार नाही, असेही त्यात लिहिलेले होते. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ. सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या होत्या. त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दीपून गेल्या होत्या. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते. अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  दुसऱ्याच दिवशी डॉ. सविता डॉ. मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या.

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ. सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीनबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही, असे तो गमतीत बोलला. 

   

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  अखेर रात्रभर विचार करून डॉ. सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची घटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते. 

   

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता यांच्या लग्नासाठी 15 एप्रिल 1948 ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकरणार होता. त्यानंतर मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. या दरम्यानच्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ. मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते. 

   

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  यावेळी डॉ आंबेडकर दिल्लीच्या 1 हार्डींग्ज अॅव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. 15 एप्रिलला विमानतळावरून डॉ. सविता कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जातात बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांची ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री. चित्रे यांची सून सविता यांनी आत घेऊन गेल्या. त्यांनी सविता यांना साजश्रृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्तेष्ठांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ. सविता यांचा नोंदणी पद्धतीने याठिकाणी विवाह झाला. सविता यांच्या वतीने त्यांना भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टरसाहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. 

   

 • Story about the second marriage of Dr. Babasaheb Ambedkar

  विवाहानंतर वार्ताहरांनी फोटो घेतले. त्यानंतर दुपारी निवडक मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तसेच त्याचदिवशी सायंकाळी बंगल्यात एक छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित केला होता. बाबासाहेबांना स्वागत समारंभ थाटात करायचा होता. वातावरणामुळे सविता यांनी तसे करण्यास नकार दिला.

   

  डॉ. सविता आंबेडकर यांनी अखेरपर्यंत बाबासाहेबांची सेवा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले. 

   

Trending