आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे ६ वर्षांचा सेलिब्रिटी शेफ किचा, रेसिपी व्हिडिओचे फेसबुकने घेतले हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - कडवानाथ्रामध्ये जेव्हा त्या घरात मी प्रवेश केला तेव्हा किचा टीव्हीवर कार्टून पाहत होता. त्याने मला ग्रीट केले आणि गायब झाला. पुन्हा मग तो मला बिल्डिंग ब्लॉक, टॉय गन, कारच्या मध्ये खेळताना दिसला. त्याची सर्व खेळणी एकदम स्वच्छ साफ आणि व्यवस्थित होती. काही वेळ खेळल्यानंतर सर्व खेळणी त्याने जिथल्या तिथे व्यवस्थित जमा करून ठेवली. किचाला समोर पाहून विश्वास करणे कठीणच होते की हा तोच वंडर किड आहे, जो यूट्यूबवर झाकोळून गेला आहे. आपल्या रेसिपीने हा सहा वर्षांचा शेफ निहाल राज किचा यूट्यूबवर शेफ युनिफॉर्ममध्ये तर एकदम लहानगा बोलका असा वाटतो. ऑरेंज जेली, कोकोनट पुडिंग, मँगो आइस्क्रीमसारखे अनेक पदार्थ तो तयार करताना मधूनमधून तो एकदमच - ‘वॉव....यमी’ असे उद््गार काढत असतो. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेला आहे अशी पुसटशीही झलक-खूण पाहायला मिळत नाही. तो इंग्रजीत बोलत असतो. पण मध्येच हिंदीतही सांगतो की, एक, दो, तीन...., आइस्क्रीम डन. बॉडी लँग्वेज, काम आणि बोलणे तर एखाद्या अनुभवी व्यावसायिक शेफसारखे असते. पण जेव्हा तो खेळण्याने घेरलेला असतो तेव्हा तो एक वेगळाच मुलगा असतो.

अॅप्रॉन आणि ओव्हरसाइज शेफ कॅप घातलेला किचाचे मिकी माऊस मँगो आइस्क्रीम तयार करण्याचा त्याचा व्हिडिओ फेसबुकला इतका आवडला की त्यांनी त्याचे हक्कच दोन हजार डॉलरला (जवळपास १ लाख ३५ हजार रुपये) विकत घेऊन टाकले. जानेवारी २०१५ मध्ये सरू झालेल्या किचाच्या यूट्यूब चॅनलवर विविध रेसिपीच्या १२ व्हिडिओ आहेत. किचाची आई रुबी या होम बेकर आहेत. किचा नेहमीच आईच्या आसपास फिरत असतो. आई सांगते की, मी तर घाबरलेच होते. जेव्हा त्याने पहिल्यांदा मला सांगितले की, मला कुकिंग करायचे आहे तेव्हा मी त्याला नाऊमेद करण्याचा प्रयत्न केला. बेकिंगमध्ये मुलांसाठी अनेक प्रकारचे धोके असतात. पण मी त्याला सोप्या सोप्या रेसिपी देऊ लागले.

चार वर्षांच्या वयातच तो संगणकाचा वापर करू लागला होता. आणि त्याला अमेरिकी मुले इवानचा यूट्यूब चॅनल इवानट्यूब फारच पसंत पडले होते. एक दिवस अचानकच त्याने सांगितले की मला आपले यूट्यूब चॅनल सुरू करावयाचे आहे. पालक आश्चर्यचकितच झाले. किचाने इवानप्रमाणेच टॉयसचा रिव्ह्यू करून दाखवला. मग एक दिवस जेव्हा तो आईसह किचनमध्ये मदत करत होता. तेव्हा वडील राजगोपाल यांनी त्याचे हावभाव, सादरीकरण नोटीस केले. त्यांनी आपल्या मोबाइलवरच त्यास शूट केले आणि हाच व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला. यास मोठ्या प्रमाणावर लाइक मिळाल्या तेव्हा वडिलांना वाटले की यावर किचाचे यूट्यूब चॅनल सुरू करायला हवे. याप्रमाणे किचाट्यूब एचडी सुरू झाले. किचाच्या व्हिडिओत आईचीच रेसिपी असते. ही रेसिपी सहज सोपी आणि मुलांना समजण्यास सरळ सोपी आहे. पण त्याच्या व्हिडिओत मोठ्या प्रमाणात अशी कुठलीही विशेष स्क्रिप्ट नसते. सर्व काही स्वाभाविक नैसर्गिक पध्दतीने होत असते. वडील सांगतात की, किचा आता फक्त सहा वर्षांचा आहे. खूप सारे घटक लक्षात ठेवणे त्याच्यासाठी कठीणदेखील आहे. इतर मुलांप्रमाणे किचालाही कुकीज आणि मिठाई आवडते. पण जेव्हा त्याला विचारले की तुम्हाला काय आवडते तेव्हा त्याने स्मितहास्य केले आणि म्हणाला, जे मी बनवतो तेच. वडील सांगतात की एकदा त्याने मला म्हटले की, मी फूड कंपनी सुरू करू इच्छितो. मग मी त्याला वेगवेगळ्या फूड कंपन्या आणि रेस्तराँ व्यवसायाची माहिती दिली. मग विचारले, तुला कशी कंपनी उघडायची आहे? त्याने म्हटले की, मुलांसाठी फूड कंपनी सुरू करायची आहे. तो नेहमी अंतराळाबाबत बोलत असतो. मी अंतराळवीरांचा शेफ होऊ इच्छितो असे त्याने एकदा सांगितले होते.

फेसबुकवरून मिळालेला बहुतांश पैशाचा वापर किचाने ऑटिझमने प्रभावित मुलाच्या मदतीसाठी केला. तोही किचाप्रमाणेच सहा वर्षांचा आहे. त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत खेळतो.

वडील म्हणतात की, किचाला त्याची सोबत एवढी आवडते की, तेथून त्याला घरी परत आणणेही अनेकदा कठीण होते. फेसबुककडून मिळालेल्या अधिकांश पैशाचा वापर किचाने ऑटिझम आजाराने प्रभावित एका मुलाच्या मदतीसाठी केला. तोदेखील किचाप्रमाणेच ६ वर्षांचा आहे. तो त्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर खेळतोदेखील. वडील सांगतात की, किचाला त्याच्यासह खेळायला इतके आवडते की अनेकदा त्याला त्याच्यापासून घरी परत आणणे अनेकदा अवघड जाते.
निहालचे नाव किचा पडले त्याचीही एक गोष्ट आहे. त्याचे नाव निहालच्या आजोबाच्या नावावर कृष्णा असे ठेवले होते. जेव्हा कृष्णा आई-वडिलांसह प्रार्थना करतो तेव्हा तो कृष्ण, राम, गोविंद यांना आपल्या भाषेत सांगतो- किचा, रामा कोविंदा. याप्रमाणे जेव्हा मुलाचे प्रेमाने नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा ते किचा असे झाले. गेल्या आठवड्यात एक आणखी मेल अमेरिकी कंपनीकडून किचासाठी आला आहे. पण किचा याबाबत अधिक काही बोलत नाही. शेवटी तो एक लहान मुलगा आहे.

आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशी किचाने ला-मेरीडियनचे शेफ जेपीसह पिझ्झा बनविला होता. पुन्हा किचाने जन्मदिनाच्या दिवशी मॅरीयटमध्ये शेफ-किचन थीम वर बर्थडे पार्टी झाली. पदार्थांबाबत त्याला नेहमीच जिज्ञासा असते आणि जेव्हा तो एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा किचनमध्ये जाऊन शेफला निश्चितपणे भेटतोच आणि त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असतो.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...