आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्ष कोणी ब्लॉगकडे ढुंकूनही पाहिले नाही, आता नामांकित ब्रँडची रीघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगळी वाट - शिरीन भवानी आणि कयान काँट्रॅक्टर, फॅशन ब्लॉगर, दोन वर्षांपूर्वी तयार केला होता ब्लॉग
कयान काँट्रॅक्टर
जन्म- १ डिसेंबर १९८५
शिक्षण- कॅनडाच्या आयएएटी कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगची पदवी.
कुटुंब- वडील- वैमानिक, आई-गृहिणी.भाऊ वैमानिक आणि बहीण मरीन बायोलॉजिस्ट.
शिरीन भवानी
वय- २७ वर्षे
शिक्षण- लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून स्टायलिंगची पदवी
पती- सिद्धार्थ भवानी, जेटकिंगमध्ये संचालकपदी. २०१३ मध्ये झाला विवाह.
चर्चेत का- कपिल देव आणि दीपिका पदुकोनसोबत नाइकेचे ब्लीड ब्ल्यू कॅम्पेन केले.

मी आणि कयान १९९८ मध्ये लोखंडवाला येथे राहत होतो. मात्र आमची आेळख नव्हती. एक दिवस कयानला स्टायलिश बूट घातलेले पाहिले. मला फुटवेअरची खूप आवड आहे. तिच्या बुटाची मी तारीफ केली. तसे बूट प्रत्येक रंगात आपल्याकडे असल्याचे कयानने सांगितले. आमचे संभाषण सुरू झाले. लव्ह अँड अदर बग्ज ब्लॉगच्या शिरीन भवानीने ही माहिती दिली.

ती सांगते - आम्ही वेगवेगळ्या फॅशन स्कूलमध्ये असल्याने सायंकाळी भेट होत असे. चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला. चर्चगेट लोखंडवालापासून दूर होते. या संपूर्ण प्रवासात आम्ही फॅशनविषयीच बोलत होतो. अनेकदा वांद्रे येथेच उतरून जात असू. फॅशनच्या दुनियेत आपल्याला काय करता येईल, याची तिथेच चर्चा करत असू. कॉलेजला क्वचित जात होतो. तिथेच एका रेस्टॉरंटमध्ये एका टिश्यू पेपरवर भावी योजना लिहिली. तो टिश्यू पेपर अजूनही ठेवला आहे. स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतल्यावर दोघींची ताटातूट झाली. शिरीन लंडनला गेली. कयान कुटुंबीयांसह कॅनडात स्थायिक झाली. ई-मेल व फोनवर परस्परांच्या संपर्कात होत्या. शिक्षण पूर्ण केल्यावर दोघीही बॉलीवूडमध्ये काम करू लागल्या. भवानीने रिया कपूरसोबत सोनम कपूरसाठी स्टायलिंग केले. कयानने निहारिका भसीनसोबत काम केले. लग्नानंतर बॉलीवूडसाठी काम करणे माझ्यासाठी अवघड झाले, असे शिरीन म्हणते. पतीला माझ्या काँट्रॅक्टविषयी सांगितले. पती सिद्धार्थ यांनी फॅशन ब्लॉग तयार करण्याचा सल्ला दिला. शिवाय तंत्रज्ञानाच्या पातळीवर सहकार्य केले. दोन वर्षांपूर्वी ब्लॉग सुरू केला. सुरुवातीला ब्लॉगला एकही हिट मिळाली नाही. एकदा लग्नासाठी डिझाइन केलेले पोशाख कयानने परिधान केले. शिरीनने त्या पोशाखातील छायाचित्रे ब्लॉगवर टाकली.

एका दिवसातच अनेक हिट्स मिळाल्या. ब्रँडेड कपड्यांचे फोटो शूट करून ब्लॉगवर टाकले. त्याला अनेक हिट्स मिळाल्या. कयानने ब्लॉगला भरपूर वेळ दिला. तिने आता बॉलीवूडसाठी काम करणे थांबवले. केवळ ब्रँडसाठी कयान काम करत आहे. आेन्ली, वेरो मोडासारख्या ब्रँडसोबत आता त्या काम करत आहेत. नुकतेच कपिल देव आणि दीपिका पदुकोनसोबत त्यांनी नाइके ब्रँडसाठी काम केले. हे कॅम्पेन ही एक मोठी संधी होती.