आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात Click झाला औरंगाबादचा फोटोग्राफर पाहा प्राण्याचे Amazing PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैजू पाटील हे आजघडीला फोटोग्राफी क्षेत्रातील महाराष्ट्र किंवा आपल्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठे नाव आहे. प्रामुख्याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या बैजू पाटील यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने या औरंगाबादचे नाव जगभरात पोहोचवणा-या छंदवेड्या छायाचित्रकाराच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा थोडक्यात आढावा आपण जाणून घेणार आहोत.

फोटोग्राफीची आवड असलेल्या बैजू पाटील यांनी आपणही पर्यावरणाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून हळू हळू पूर्णपणे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे त्यांच्या फोटोग्राफीला पर्यावरण संवर्धनाचे काम म्हणून ओळखही मिळाली. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित कार्यक्रमांमध्येही त्यांना आवर्जुन बोलावले जाते. अशाप्रकारचे फोटो मिळवण्यासाठी त्यांना अनेक दिवस जंगलांमध्ये तळ ठोकून राहावे लागते.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा अत्यंत कठीण आणि प्रसंगी धोकादायक ठरणारा प्रकार असल्याचे बैजू यांचे म्हणणे आहे. पण त्याचवेळी या फोटोग्राफीच्या वेळी अत्याधिक आनंदही मिळत असल्याचे बैजू यांचे म्हणणे आहे. वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करताना केवळ फोटोग्राफीचे नियम लक्षात ठेवून चालत नाही, तर फोटोशूटसाठी तुम्ही निवडलेली जागा, बॅकग्राऊंड याचाही कटाक्षाने विचार होणे गरजेचे असल्याचे बैजू सांगतात. जगभरात फोटोग्राफीसाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. पण भारत कोणत्याही दृष्टीने कमी नाही. भारताची विविधता हीच सर्वाच मोठी शक्तीही आहे. चांगल्या फोटोसाठी आवश्यक ते सर्वकाही आपल्याला याठिकाणी मिळू शकते असे त्यांचे स्पष्ट मत आहे. जगभरात माझ्या नजरेतून भारतीय वाईल्ड लाईफचे दर्शन घडवण्याची संधी मिळत असल्याचा आनंद मोठा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
बैजू पाटील यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. RBS - Sanctuary award for the Best Wildlife Photographer - 2010 हा त्यापैकी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. तसेच वाईल्ड लाईफवर आधारित असलेले त्यांचे WILDSCAPE नावाचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आणि मुकेश अंबानींच्या उपस्थित राजभवनात त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहुयात, बैजू पाटील यांचे काही Amazing Photos...