आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२० देशांमध्ये ७२० योग स्कूल, आता बलात्काराचे आरोपी आहेत हे योग गुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रम चौधरी, योग गुरू
वय : ६९ वर्षे
कुटुंब : पत्नी राजश्री चौधरी (३२ वर्षे)
यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे.माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या बोलावण्यावरून अमेरिकेत गेले आणि तिथेच वास्तव्य.
फेब्रुवारी महिन्यात लॉस एंजलिसच्या सुप्रीम कोर्टात आंतरराष्ट्रीय योग गुरू विक्रम चौधरी यांच्यावर कॅनडाच्या एका महिलेने शारीरिक शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे. २०१० मध्ये लास वेगासमध्ये टीचर ट्रेनिंग इव्हेंटदरम्यान आपल्यापेक्षा ३८ वर्षे लहान महिलेने त्यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता.

३८ वर्षे लहान सारा बागन यांनी केलेल्या आरोपात २००० मध्ये विक्रमने त्यांच्या कानात सेक्ससंदर्भात आक्षेपार्ह बोलले होते. मात्र, या महिला आपल्यावर प्रेम करतात, वकिलांच्या सांगण्यावरून काहीबाही आरोप केले जात असल्याचे विक्रम यांचे म्हणणे आहे. विक्रम यांच्याकडून योग शिकणाऱ्यांमध्ये मेडोना, डेमी मुरी यांच्यापासून चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लुनी यांचा समावेश आहे. डेव्हिड बॅकहॅमनेही योग केला आहे. मायकेल जॅक्सन त्यांच्या अनुयायांमध्ये होता. १९७३ मध्ये तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी आपला अाजार बरा करण्यासाठी विक्रम यांना बोलावले होते, असे सांगितले जाते. त्यांच्या योगविद्येच्या प्रसिद्धीमुळे जगातील २२० देशांत ७२० विक्रम योग स्कूल सुरू करण्यात आले. ते हॉलीवूड हिल्ससारख्या महागड्या भागात राहतात आणि ४० रोल्स रॉयल्सच्या ताफ्यातून जातात.
बातम्या आणखी आहेत...