आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त : स्पेनच्या शाही कुटुंबाची यांच्यामुळे कोर्टापर्यंत फरपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिस्टिना, स्पेनची युवराज्ञी
जन्म - १३ जून १९६५
वडील- जुआन कार्लोस पहिले,(स्पेनचे राजे) आई, सोफिया ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क
शिक्षण- माद्रिद विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी, एमए.
चर्चेत - त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे प्रकरण सुरू

मे २०१० ची घटना आहे. अाॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष अंतोनियो समारांच यांचे निधन झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्कारास क्रिस्टिना आणि त्यांचे पती इनाकी उरदनगारिन(प्रसिद्ध हँडबॉल खेळाडू) यांचा सहभाग नसणे लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला होता. अखेर दोघे का आले नाहीत. काही अन्य कार्यक्रमांमध्येही दोघे दिसले नाहीत. दोघांविरुद्ध फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला त्यामुळे ते लोकांसमोर येत नव्हते.
स्पेनची युवराज्ञी क्रिस्टिना यांनी पहिल्यांदा १९९६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इनाकीना पहिल्यांदा पाहिले. निळ्या डोळ्याच्या उंचापुऱ्या इनाकीचा क्रिस्टिनावर जीव जडला आणि १९९७ मध्ये दोघांनी लग्न केले. क्रिस्टिना १९८८ मध्ये सेऊल ऑलिम्पिक स्पर्धेत सेलिंग टीमच्या संघात सहभागी होती. त्यामुळे तिला खेळात विशेष रस होता.

राज्यशास्त्राचा अभ्यास करून पदवी प्राप्त करणारी स्पेनच्या राजघराण्यातील ती पहिली मुलगी आहे. विद्यापीठातही तिच्यासोबत अंगरक्षक जात होता. भाऊ फिलिप सहावा याच्यासोबत तिचे चांगले संबंध होते. मात्र, फिलिप सिंहासनाचा वारसदार ठरल्यानंतर तिचा दृष्टिकोन बदलला. आता ताे आपल्या बहिणीलाही एखाद्या खासगी कार्यक्रमात बोलावणे पाठवत नाही. लग्नाच्या वेळी क्रिस्टिना आणि इनाकीला दिलेली पदवीही परत घेण्यात आली. न्यायालयात खटला सुरू असलेल्या त्या राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी निधीचा अफरातफर केल्याचा पती इनाकीवर आरोप आहे. या घोटाळ्यात सहभागी असल्याचा क्रिस्टिना यांच्यावरही आरोप आहे.