आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायचे होते अमेरिकेला, पत्नीच्या सल्ल्यावरून माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूजमेकर | अजित जैन, सीईओ, पुनर्विमा विभाग, बर्कशायर हॅथवेलाखात पाच जणांना होणारा आजार त्यांच्या मुलाला जडला. त्यासाठी त्यांनी फाउंडेशनची स्थापना केली.
जन्म- २३ जुलै १९५१
शिक्षण-आयआयटी खरगपूरमधून मेकॅनिकल इंिजनिअरिंगमध्ये बीई, हार्वर्डमधून एमबीए.
कुटुंब- पत्नी टिंकू, एक मुलगा.
चर्चचे कारण? वॉरेन बफे यांचा वारसदार म्हणून जैन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य वॉरेन बफे यांनी एकदा म्हटले होते की, मी, माझा सहकारी मुंगेर आणि अजित जैन तिघेही एका नावेत प्रवासाला निघालो आणि नाव बुडायला लागली, तर त्यातून एकच व्यक्ती वाचवू शकते. ती म्हणजे अजित जैन. बफे यांना जैन यांच्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वास असल्याचे ते स्वत: सांगतात. आयआयटी खरगपूरमध्ये पदवी शिक्षण घेताना त्यांचे वर्गमित्र रोनोजॉय दत्ता यांच्या मते, जैन यांनी शिक्षणाकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. ते तासन््तास अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्हिएतनाम युद्धाबाबतच चर्चा करत राहायचे. त्यांचे एक सहकारी विजय त्रेहन यांच्या मते, अजित व रोनोजॉय आयुष्यात कधीच गंभीर नसायचे. मात्र, आज ते यशोशिखरावर आहेत.

जैन यांना वॉरेन बफे यांचे वारसदार मानले जात आहे, तर रोनोजॉय हे जगातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनी युनायटेड एअरलाइन्सचे अध्यक्ष आहेत. आयआयटीतील शिक्षणानंतर तत्काळ १९७३ मध्ये अजित जैन आयबीएममध्ये सेल्समन म्हणून काम करू लागले; परंतु आणीबाणीच्या वेळी १९७६ मध्ये भारत सरकारच्या काही कायद्यांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातून काढता पाय घेऊ लागल्या. यात आयबीएमचाही समावेश होता. १९७८ मध्ये त्यांनी अमेरिकेत हार्वर्डमधून एमबीए केेले आणि मॅकेंजी अँड कंपनीत रुजू झाले. १९८० मध्ये भारतात परतले आणि टिंकू जैन यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यानंतर परत अमेरिकेत आले. नंतर महिनाभर भारतात राहिले. मात्र, या वेळी त्यांना परत अमेरिकेत जायची इच्छा नव्हती, परंतु त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर दबाव टाकला. १९८६ मध्ये मॅकेंजी सोडून त्यांनी वॉरेन बफे यांच्या विमा कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली. वास्तविक, १९८२ मध्ये मॅकेंजीमधील त्यांचे बॉस मायकल गोल्डबर्ग यांनीसुद्धा कंपनीचा राजीनामा दिला होता आणि चार वर्षे सोबत काम केल्यामुळे त्यांनीच जैन यांना बर्कशायर हॅथवेमध्ये बोलावले होते. जैन यांनी गोल्डबर्ग यांना विम्याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांना वॉरेन बफे यांची "प्रॉफिट मशीन' असे संबोधले जाते. बफे यांनी भारतभेटीवेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना म्हटले होते की, आपल्याकडे जैन यांच्यासारखे आणखी लोक असल्यास माझ्याकडे पाठवा.

माझ्या कंपनीच्या समभागधारकांना माझ्यापेक्षा अजित जैनवर विश्वास आहे. जैन जयपूरमध्ये असो वा जगात कोठेही, बफे त्यांच्याशी दिवसभर चर्चा करत राहतात. त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याशिवाय ते झोपतच नाहीत. त्यामुळे ते जैन यांना "आयडिया फॅक्टरी' म्हणतात. बफे सांगतात की, जेव्हा जैन यांना पहिल्यांदा कार्यालयात बघितले होते तेव्हाच लक्षात आले होते की, आम्हाला आमचा सुपरस्टार भेटला. अजित यांना एक मुलगा आहे. मात्र, त्यास डिस्फरलिन या गंभीर आजाराने ग्रासले आहे. हा आजार लाखभर लोकांतून पाच जणांनाच जडतो. त्यामुळेच अजित यांनी जैन फाउंडेशनची स्थापना केली असून ते या आजाराशी संबंधित संशोधनात मदत करते. अजित यांची चुलत बहीण अंशू जैन यांनी नुकताच ड्युश बँकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.