आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार - कागदी पिशव्या बनवण्याचा दृढनिश्चय सार्थक, जगभरात मुक्कू बॅग्जना मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आपल्या आईसोबत अब्दुल मुकीत.

अब्दुल मुकीत : आठवीचा विद्यार्थी
वय : १३ वर्षे
कुटुंब : आई- अंदबिल फातिमा, वडील - अब्दुल मन्नान, मोठा भाऊ आणि बहीण
शिक्षण : इंडियन स्कूलमध्ये आठवीचा विद्यार्थी
चर्चेत : या मुलाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयआयटी बनारसच्या विद्यार्थ्यांनी ५ लाख पेपर बॅग्ज बनवण्याचे ठरवले आणि अब्दुल मुकीतला आपल्या कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले.

१३ वर्षांचा अब्दुल अबुधाबीच्या इंडियन स्कूलमध्ये आठवीचा विद्यार्थी आहे. एके दिवशी मुख्याध्यापकांनी कागदी पिशव्यांचा वापर करण्यास सांगितले. त्या वेळी तो पाचवीत शिकत होता. पॉलिथिन पिशव्यांपेक्षा कागदी पिशव्या कशामुळे चांगल्या असतात, असा सवाल त्याने आईला केला. पॉलिथिन बॅग्ज पर्यावरणासाठी कशा हानिकारक असतात हे त्याला पटवून देण्यात आले. या गोष्टीने अब्दुलच्या मनात घर केले. तेव्हापासून तो घरी आल्यानंतर कागदी पिशव्या बनवू लागला. दररोज तो किमान १५ पिशव्या बनवत होता. २०१० मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये प्लास्टिक बॅग्जमुक्त मोहीम सुरू होती. त्या वेळी अब्दुलने जुन्या वर्तमानपत्रांतून अनेक लिफाफे बनवले. त्याचे अबुधाबीमध्ये वाटप केले. पाहता पाहता लोकांनाही त्यातून प्रेरणा मिळत गेली. शाळा-कॉलेज आणि अन्य संस्थांमध्ये अब्दुलच्या कार्यशाळा होऊ लागल्या. यातून त्याला "पेपर बॅग बाॅय' अशी ओळख मिळाली.
कागदी पिशवी मुक्कू बॅग्ज नावाने परिचित झाली. यानंतर अब्दुलला खासगी कंपनी व सरकारी संस्थांमध्ये पेपर बॅग्जच्या कार्यशाळेसाठी निमंत्रण मिळाले. २०११ मध्ये अबुधाबी पुरस्कार प्राप्त करणारा अब्दुल सर्वात कमी वयाचा मुलगा ठरला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने पेपर बॅग्जच्या पुढाकारासाठी अब्दुलची निवड केली व इंडोनेशियातील परिषदेला पाठवले. संयुक्त अरब अमिरातीच्या सर्व मॉल्समध्ये त्याने बनवलेल्या पिशव्या घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. फर्निचर स्टोअर द वनच्या आपल्या ग्राहकांना अब्दुल बॅग्ज घेण्यास सांगतो. पॉलिथीन पिशव्यांना नकार देत कागदी पिशव्यांचा वापर करण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाने या मुलापासून प्रेरणा घेतली आहे. आयआयटी बनारस टेक्नो मॅनेजमेंट मेळ्याला या वर्षी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी अब्दुलला निमंत्रित केले आहे.