आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायक - मंत्र्याला उत्तर देण्यासाठी आत्मचरित्र लिहिले, पण अत्याचाराची वाच्यता टाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीला कॉप्स : कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान
जन्म : २७ नोव्हेंबर १९५२
वडील : व्हिक्टर (मेयर), आई- गोराल्डिन (नगरसेवक)
शिक्षण : फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये पदवीधर (िकंग्ज युनि. कॉलेज)
कुटुंब : तीन विवाह. सध्याचे पती ऑस्टिन थ्रोन. दुसऱ्या लग्नातून मुलगी डेनिली.
चर्चेत : एका खासदाराने अत्याचार केल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

कॅनडाच्या ओंटारयो येथील हेमिल्टन शहरात एका राजकीय कुटुंबात शीलांचा जन्म झाला. वडील व्हिक्टर हेमिल्टन शहराचे मेयर, तर आई गेराल्डिन नगरसेविका होती. त्यांचा सुरुवातीपासूनच जिद्दी स्वभाव होता. लहानपणी त्या दारूच्या दुकानासमोर उभे राहत असत. शाळेच्या निधी संकलनासाठी यापेक्षा दुसरे चांगले ठिकाण नसल्याचे त्यांचे मत होते. त्या या दुकानासमोर चॉकलेट विकून शाळेसाठी निधी गोळा करत. शिक्षकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला, मात्र त्या आपल्या ध्येयावर ठाम होत्या.

डाव्या विचारसरणीकडे कल असल्यामुळे त्या कॅनडाच्या लिबरल पार्टीशी जोडल्या गेल्या. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राजकारणात विशेष स्थान मिळाले. २५ व्या वर्षी १९७७ मध्ये पहिल्यांदा ओंटारियोमधून निवडणूक लढवली. मात्र, १४ मतांनी पराभव पत्कारावा लागला. यादरम्यान महिलांवरील हिंसाचार रोखण्याबाबतच्या दौ-यामध्ये एका खासदाराने त्यांच्यावर बलात्कार केला होता. पोलिसांत तक्रार देण्यास गेल्यानंतर खासदाराने रोखले. खासदाराला पुन्हा असे न करण्याची समज दिली. राजकारणात येण्याआधी ज्या व्यक्तीशी त्या डेटिंग करत होत्या, त्यानेही अत्याचार केला होता. या काळीमा फासणाऱ्या घटनांना मागे टाकत त्यांनी १९८१ मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. तीन वर्षांतच त्या राष्ट्रीय राजकारणात आल्या. त्या विरोधी पक्ष लिबरल पार्टीच्या प्रभावी नेत्या गणल्या जाऊ लागल्या. दोन भाषा येत असल्याचा त्यांना राजकारणात फायदा झाला. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातच त्यांनी आत्मचरित्र लिहिले. त्याचे शीर्षक होते नोबडीज बेबी. या पुस्तकातून त्यांची शैली दिसते. त्या वेळी कायदेमंत्री जॉन कार्सबी संसदेतील चर्चेत म्हणाले होते, जस्ट क्वाइट डाऊन बेबी. असे असले तरी त्या गैरवर्तनाची तक्रार पोलिसांत देऊ शकल्या नाहीत.

पदावर कार्यरत असताना १९८७ मध्ये मुलीला जन्म देणा-या त्या कॅनडाच्या पहिल्या खासदार आहेत. १९९३ मध्ये त्यांचा पक्ष सत्तेत आला तेव्हा कॅनडाच्या पहिल्या महिला उपपंतप्रधान झाल्या. माल व सेवा कराच्या विरोधात त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. लिबरल पार्टी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या माइक क्राली यांच्याकडून पराभूत झाल्या.