आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव: मेरठच्या पॅथालॉजिस्टच्या कन्येने केला घातक झिका व्हायरस डिकोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देविका सिरोही,  रिसर्च स्कॉलर - Divya Marathi
देविका सिरोही, रिसर्च स्कॉलर
यंदाच्या जानेवारी महिन्यापासून झिका विषाणू अमेरिकेसह जगातील ३३ देशांत थैमान माजवले आहे. डास चावल्याने होणाऱ्या या आजाराचा गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या मस्तिष्कावर परिणाम होतो. या आजारामागील कारणे शोधण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळांत संशोधन सुरू असून परड्यू विद्यापीठाचाही त्यात समावेश आहे. विद्यापीठाच्या संशोधक चमूत मेरठच्या देविका सिरोहीचाही समावेश आहे. या चमूने आजाराच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी विषाणू यशस्वीरीत्या डिकोड केले आहे.

सात सदस्यीय चमूत देविका सर्वांत लहान आहे. तिच्या पीएच.डीचा विषय फ्लेव्हीव्हायरसची संरचना समजून घेण्याशी निगडित असून तो या संशोधानाशी संबंधित आहे. देविकाने आम्हाला ई-मेलवरून पाठवलेल्या माहितीनुसार, झिका विषाणूची संरचना अन्य फ्लेव्हीव्हायरसपेक्षा वेगळी आहे. या समूहात डेंग्यू, वेस्ट नाइल, कावीळ, मेंदूज्वरच्या विषाणूंचाही समावेश असतो. उर्वरित विषाणूंची ओळख पटली आहे. दरम्यान, देविकाच्या चमूने झिका विषाणूच्या संरचनेची डिकोडिंग केली असून या आजाराच्या मुळापर्यंत जाण्यात हीच मोठी अडचण होती. देविकाच्या मते, गर्भात वाढत असलेल्या बाळावर अन्य विषाणूंचा परिणाम होत नाही. मात्र, झिका विषाणूत तसे बळ असते. कारण, याची संरचना अन्य विषाणूंपेक्षा भिन्न आहे. आधी देविका डेंग्यूच्या विषाणूचा अभ्यास करत होती. मात्र, नंतर तिच्याकडे झिका विषाणू डिकोड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मेरठच्या डिफेन्स कॉलनीत राहणारे देविकाचे वडील पॅथालॉजिस्ट असून आई रिना बालरोगतज्ज्ञ आहेत. मागील पाच वर्षांपासून देविका अमेरिकेत पीएच.डी. करत आहे. तिच्या मते, या विषाणूची रचना जाणून घेण्यात चार महिने लागले. या दरम्यान आम्ही फक्त २-३ तासच झोपू शकत होतो. मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा इतके काही करायला मिळेल असे वाटले नव्हते. यंदा वर्षअखेरपर्यंत ती तिचा थिसिस जमा करून टाकेल.
देविका सिरोही, रिसर्च स्कॉलर
वय- - २९ वर्षे
वडील- डॉ. सत्येंद्र एस. सिरोही, आई- डॉ. रिना
शिक्षण - दयावती मोदी अकॅडमीमधून शालेय शिक्षण, दिल्ली विद्यापीठातून बायाेकेमिस्ट्रीमध्ये ऑनर्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून एमएस्सी, परड्यू युनिव्हर्सिटी अमेरिकेतून पीएच.डी.
चर्चेचे कारण - झिका व्हायरस डिकोड करणाऱ्या चमूत देविकाचे महत्त्वाचे योगदान आहे.

(परड्यू विद्यापीठातून तिने 'दिव्य मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार)
पुढे वाचा...सुलभ रक्कम हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँकही घेते यांची मदत