आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार : पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या महिला अधिकारी इनाम गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इनाम गंभीर, आयएफएस
वय - सुमारे २८ वर्षे
शिक्षण - जिनिव्हात झालेले आहे


पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अत्यंत वाईट पद्धतीने लाथाडणारी परराष्ट्र मंत्रालयातील पहिल्या अधिकारी इनाम गंभीर या होत. भारताच्या जम्मू-काश्मिरातील स्थितीच्या बाबतीत लावलेल्या मोठमोठ्या आक्षेपांच्या उत्तराच्या अधिकाराचा उपयोग करताना संयुक्त राष्ट्रात भारताच्या कायमस्वरूपी मोहिमेच्या पहिल्या सचिव इनाम गंभीर यांनी म्हटले आहे की, मानवाधिकाराचे सर्वात मोठे उल्लंघन दहशतवाद आहे. याचा उपयोग सरकारी धोरणाच्या स्वरूपात केला जातो तेव्हा हा युद्धगुन्हाच आहे.भारत आणि इतर देश आज पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रायोजित करण्याच्या धोरणाचा सामना करत आहेत. त्याचे परिणाम अमर्याद विस्तारले आहेत.

गंभीर या बोलण्यापूर्वीच काही वेळापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा नेहमीप्रमाणे उपस्थित केला होता. गंभीर २००५ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या. २००८ ते २०११ पर्यंत अर्जेंटिनात भारतीय दूतावास त्यांनी सांभाळले आहे. त्या सध्या परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी आहेत. अमेरिका,पाकिस्तानात या मुद्द्याची चर्चा आहे की, जाणूनबुजून एवढ्या तरुण महिलेला संयुक्त राष्ट्र स्थायी मिशनमध्ये पाठवले गेलेय. गंभीर म्हणाल्या की, आम्ही एका कुख्यात दहशतवादी संघटनेच्या स्वयंघोषित कमांडरसाठी पाक पंतप्रधानांकडून दिल्या गेलेल्या समर्थनाचे बोल ऐकलेले आहेत. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपला होता. त्या म्हणाल्या प्राचीन काळी शिक्षणाच्या प्रमुख केंद्रामध्ये एक तक्षशिलेची ही पवित्र भूमी आज आयव्ही लीग ऑफ टेरेरिझम झाली आहे. दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.
पुढे वाचा..
> पर्वतावरील बर्फ पेयजलात बदलण्याचे काम करणारी हनी
> विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ६० कोटी घेऊन फरार
बातम्या आणखी आहेत...