आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 रुपयांसाठी सामना खेळला, मॅगी खाऊन उदरनिर्वाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारशे रुपयांसाठी सामना खेळण्याचे दिवस हार्दिक कधीही विसरू शकत नाही. बॅटही दुसऱ्याकडून मागावी लागायची. जेवण म्हणजे फक्त मॅगी. हार्दिक सांगतो, ‘चार वर्षांपूर्वीपर्यंत तर मी व्यवस्थित बोलूही शकत नव्हतो. मला इंग्रजी बोलायचे होते, पण बोलू शकत नव्हतो. त्यामुळे लोक थट्टा करत असत. पण त्यामुळे माझा विश्वास आणखी दृढ झाला.’ २३ वर्षीय हार्दिक आता भारतीय क्रिकेट संघाचा प्राण आहे.

अष्टपैलू असलेला हार्दिक २०१६ मध्ये आयसीसीच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या अंतिम षटकातील गोलंदाजीमुळे चर्चेत आला. तीन वर्षांपूर्वीपर्यंत हार्दिक गुजरातच्या गावांत कोणत्याही संघाकडून चारशे रुपयांत खेळण्यास तयार होत असे. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला १० लाख रुपयांत खरेदी केले. एकेकाळी हार्दिकच्या कुटुंबीयांची आर्थिक अवस्था चांगली नव्हती. वडील हिमांशू यांचा कार फायनान्सचा व्यवसाय होता. पण हार्दिक आणि त्याचा भाऊ कुणालच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्यांनी आपला चांगला चाललेला व्यवसाय बंद केला आणि सुरतहून बडोद्याला आले.  
 
तेथे व्यवसाय चालला नाही. नंतर वडील लहानमोठी कामे करून घर चालवत होते. त्याच वेळी वडील आजारी पडले. दोन वर्षांत तीन हार्ट अॅटॅक आले. मधुमेहही होता. अशा कठीण काळात हार्दिक आणि कुणालने स्थानिक स्पर्धांत खेळून पैसेे कमावून घर चालवले. हार्दिक ९ वी नापास आहे. त्याने किरण मोरेंच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले आहे. मोरेंना त्याची परिस्थिती माहीत झाली तेव्हा त्यांनी फीस घेतली नाही. २०१४ पर्यंत तर हार्दिकजवळ स्वत:ची बॅटही नव्हती. विजय हजारे करंडकात त्याने इरफान पठाणची बॅट घेऊन सामना खेळला होता. हेअर स्टाइलमुळे हार्दिकला हेअरी या नावाने हाक मारली जाते. हार्दिकने मोरेंच्या अकादमीत प्रवेश घेतला होता तेव्हा तो ५ वर्षांचा होता. मोरे १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देत नसत. पण हार्दिकच्या फलंदाजीच्या शैलीमुळे ते खुश झाले आणि त्यांनी त्याला प्रवेश दिला. हार्दिक सांगतो-मी अंडर १९ खेळत होतो तेव्हा डाएट मेेंटेन करणेही कठीण होते. सकाळ-संध्याकाळी मॅगी खावी लागायची. आता मी हवे ते खाऊ शकतो.     

जन्म : ११ ऑक्टोबर १९९३.  
कुटुंब : वडील हिमांशू, आई नलिनी, भाऊ : कुणाल.
चर्चेत का?- अलीकडेच त्याने आपल्या वडिलांना कारचे सरप्राइज गिफ्ट दिले.
 
बातम्या आणखी आहेत...