आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी: मुलाखतीत प्रश्न-हॉटेलचे बांधकाम किती विटांत?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेरणादायी | केशव मुरुगेश, सीईओ

केशव यांचे वडील एम. के. मुरुगेश चेन्नईकडून रणजी ट्रॉफी खेळत होते. मद्रासच्या संघाने १९५५ मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला होता, त्यात केशव यांच्या वडिलांचे योगदान महत्त्वाचे होते. मध्य प्रदेशात एम. एम. जगदाळे, बंगालमध्ये एस. गुहा आणि महाराष्ट्रात जे. ऑगस्टाइन यांचेे जे महत्त्व आहे, तसेच महत्त्व केशव यांच्या वडिलांचे आहे. एम. के. राष्ट्रीय निवडकर्तेही होते. केशव यांची आई आरतीही संपूर्णपणे क्रिकेटला समर्पित आहेत. त्यांची आई देशाच्या पहिल्या महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या व्यवस्थापक होत्या. वडील तमिळ तर आई बंगाली आहे. त्यामुळे केशव यांना दोन्ही भाषा अवगत आहेत.

केशव यांनी कारकीर्दीची सुरुवात टीव्हीचा सेल्समन म्हणून केली होती. काही दिवसांनी ते सीए झाले. एक दिवस आई सीए मॅगझिन पाहत होती. त्यात आयटीसीत एका नोकरीची संधी होती. आईने त्यांना अर्ज देण्यास सांगितले. आयटीसीत त्यांची शेवटची मुलाखत मनोरंजक होती. सीईओने केशव यांना शेवटचा प्रश्न विचारला-विशाखापट्टणमचे प्रख्यात डॉल्फिन हाॅटेल बनवण्यासाठी किती विटा लागल्या असतील? त्यांनी विचार न करताच उत्तर दिले-नऊ लाख, नऊ हजार नऊशे नव्व्याण्णव. सीईओने त्यांचे अभिनंदन करत म्हटले-तुम्हाला नोकरी मिळाली आहे. केशव १९८९ मध्ये आयटीसीत आले.

ते तेथे अंतर्गत लेखा परीक्षण विभागात काम करत होते. त्यांना आयटीसीत प्रत्येक उपक्रमात प्रशिक्षण घ्यायचे होते. एकदा विंडसर मेनर हॉटेलमध्ये चिडलेल्या पर्यटकाने त्यांच्यावर वापरलेला साबण फेकला. पहिल्यांदा प्रतिक्रियारहित राहून नम्रतेचा धडा शिकलो, असे ते सांगतात. त्यांच्या चांगल्या कामामुळेच बॉसने स्वत:च्या पैशातून त्यांना सुवर्णपदक दिले होते. त्यानंतर ते कंपनीत उपाध्यक्षही झाले. ते सिंटेलमध्येही होते. आता ते डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये सीईओ आहेत. कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहे. त्यांची पत्नी शमिनीही एका क्रिकेटपटूची मुलगी आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ते नेस्कॉम बीपीए कौन्सिलचे अध्यक्षही आहेत. मुलगी सहा वर्षांची होती तेव्हा तिने त्यांना एक सेलफोन दिला होता. हा सेलफोन घेतल्याशिवाय केशव कुठेच जात नाहीत.
जन्म- : १७ ऑगस्ट १९६३.
वडील : एम. के. मुरुगेश, आई आरती मुरुगेश, चार भाऊ, बहीण.
शिक्षण : बी. कॉम., फेलो,इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया.
कुटुंबीय : पत्नी शमिनी, एक मुलगा, मुलगी.
चर्चेत का? : कंपन्या आणि संघटनेत आता संपूर्ण भर माहितीऐवजी
विश्लेषणावर केंद्रित होत आहे.