आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त - २६ व्या वर्षी नॅशनल हीरो, आता वादात अडकले चोंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मुलासोबत ली चोंग वाई
ली चोंग वाई : बॅडमिंटन खेळाडू
जन्म : २१ ऑक्टोबर १९८२
कुटुंब : वडील- ली आ चाई, आई- कोर किम चोई, तीन भाऊ-बहीण, पत्नी- वोंग म्यु चू (बॅडमिंटन खेळाडू), मुलगा- किंगस्टन (गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जन्मला)
चर्चेत : नुकतेच जगात अव्वल स्थान पटकावणा-या या बॅडमिंटन खेळाडूवर डोपिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली आहे.
ली आणि त्याच्या पत्नीची भेट २००१ मध्ये क्वालालंपूरमध्ये राष्ट्रीय बॅडमिंटन कॅम्पमध्ये झाली होती. त्या वेळी ली १९, तर वोंग १७ वर्षांची होती. वोंगही राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. यानंतर दोघांनी ११ वर्षांनी लग्न केले. लीचे अन्य कोणासोबत प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरली होती. मात्र, वोंगने तिची सोबत सोडली नाही.
ज्यावर्षी लग्न झाले त्या वर्षात नऊ महिने आधी त्याचे आत्मचरित्र डेयर टू बी चॅम्पियन प्रकाशित झाले होते. हे मलेशियात सर्वाधिक खपाचे पुस्तक आहे. ली याला लहानपणापासून बास्केटबॉल खेळण्याची आवड होती. मात्र, आईला ते नको होते. मलेशियात ऊन जास्त असते हे त्यामागचे कारण होते. अकरा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला बॅडमिंटनच्या स्टेडियमवर आणले. त्याच्या डोळ्याच्या शटलकडे होणाऱ्या वेगवान हालचाली पाहून प्रशिक्षक त्यांना म्हणाला, या मुलास माझा शिष्य बनवू का? यानंतर सहा वर्षांतच देशातील विविध स्पर्धा गाजवल्या. बिंजईमध्ये राहणाऱ्या या खेळाडूला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळाले तेव्हा पंतप्रधान दातुक सेरी यांनी त्यास नॅशनल हीरो संबोधून गौरवले. ली आपल्या खेळाचे श्रेय वडिलांनाच देतो. मात्र, आईबाबतही तेवढाच जिव्हाळा होता. मुलाला यश मिळावे यासाठी लंडन ऑलिम्पिकमध्ये आई लीच्या गर्लफ्रेंडसोबत होती. मात्र, लग्नानंतर दोन वर्षांत आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे त्याला धक्का बसला. लीच्या वडिलांनी ६१ वर्षांच्या महिलेशी दुसरा विवाह केला.