गायत्री रेड्डी
जन्म : २१ सप्टेंबर १९८६
वडील : टी. व्यंकटराम रेड्डी, आई- मंजुला
शिक्षण - हैदराबादमध्ये शालेय शिक्षण, लंडन विद्यापीठातून बीएस्सी ऑनर्स(कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट)
चर्चेत - काही दिवसांत त्या अनीश भाटिया यांच्याशी लग्न करणार आहेत.
आयपीएलच्या स्पर्धेवेळी डेक्कन चार्जर्ससाठी चिअर करणारी तरुणी म्हणजे गायत्री रेड्डी. २०११ मध्ये आयपीएलदरम्यान ती गुगलवर सर्वात जास्त सर्च तरुणीच्या रूपात चर्चेत राहिली. गायत्रीचे वडील डेक्कन क्राॅनिकलचे मालक टी. व्यंकटराम रेड्डी आहेत. २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्स बीसीसीआयमध्ये बँक गॅरंटी वेळेत भरण्यात अपयशी ठरले होते. हा संघ सनराइज हैदराबाद असून तो मारन कुटुंबाचा आहे.
तेव्हापासून गायत्री वृत्तपत्रात फीचर एडिटरची भूमिका बजावत आहे. त्यांची आई मंजुला ही जबाबदारी सांभाळत होत्या. गायत्रींचे वडील जीवनशैलीसाठी चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचे वडील व काकांना कॅनरा बँकेत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयकडून अटक केली होती. वर्षभरात गायत्री लग्नबंधनात अडकत आहेत. त्या अनीश भाटिया यांच्याशी लग्न करत आहेत. ते एअर एशियाचे भागीदार आहेत. अनीश यांचे वडील दिल्लीतील मोठे व्यावसायिक अरुण भाटिया आहेत. अरुण भाटियांचा मोठा मुलगा अमित आहेत. सर्वात श्रीमंतांपैकी एक लक्ष्मीनिवास मित्तल यांचे ते जावई आहेत. लक्ष्मीनिवास यांची मुलगी वनीषाचे शाही लग्न अमित भाटिया यांच्याशी झाले होते. अनीश यांची एअर एशियामध्ये भागीदारी मोठा भाऊ अमित यांच्यामुळे होऊ शकली.
अमित इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल क्लब क्वीन्स पार्क रेंजर्सच्या मालकांपैकी एक आहेत. या क्लबचे दुसरे मालक एअर एशियाचे टोनी फर्नांडिस आहेत. दिल्लीच्या भाटिया कुटुंबाचा दिल्लीत रिअल इस्टेटचा खूप जुना व्यवसाय मानला जातो. ते लुटियनच्या जवळपासचे बंगले विकण्यातच रस घेतात. गायत्री यांचे लग्न १५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. याच पद्धतीने गायत्रीचे नाते एअर एशिया आणि लक्ष्मीनिवास मित्तल यांच्याशी जुळणार आहे.