आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day SPL: राजकारणाचा गोवर्धन करंगळीवर नाचवणा-या शरद पवारांचा जीवनप्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यकर्त्यांकडून जाणता राजा हे बिरूद मिळवलेल्या शरद पवारांचा जन्म बारामतीजवळच असलेल्या काटेवाडी या गावात झाला. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या शरद पवारांना राज्याच्या राजकारणाचे मूळ समजले जाते. राज्यात कोणत्याही पक्षात अथवा सरकारमध्ये काही घडामोडी असल्यास, त्याचे मूळ शरद पवारांच्या राजकीय खेळीमध्ये आहे असे समजले जाते. सर्वाधिक काळ सत्तेचा उपभोग घेतलेल्या या नेत्याचा जीवनप्रवासही त्या अर्थाने चांगलाच रंजक आहे...

12 डिसेंबर रोजी जन्मलेले शरद पवार आज पंच्याहत्तीरमध्ये प्रवेश करत आहे. त्याच्या 75 वर्षांच्या या जीवनप्रवासामध्ये सुमारे 50 हून अधिक वर्षे सक्रीय राजकारणात पवारांचा सहभाग आहे. नुसता सहभागच नव्हे तर त्यांचा या संपूर्ण कालखंडात राज्याच्या राजकारणात वरचष्मा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्याच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुराही त्यांनी चार वेळा सांभाळलेली आहे. त्याशिवाय केंद्रात पंतप्रधान बनण्याची त्यांची संधीही अगदी थोड्या फरकाने हुकली आहे. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही केंद्रस्थानी राहण्याची किमया शरद पवारांनी साधली आहे. स्वतःच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या नेतृ-त्वाची जबाबदारी कोणावर असावी यावर शरद पवारांचा प्रभाव असतो असे म्हटले जाते. पण हे गमतीमध्ये म्हटले जात असले तरी ते पूर्णपणे नाकारण्याची हिम्मत कोणी सहज करू शकणार नाही.
पुढील स्लाईड्सवरून जाणून घ्या शरद पवारांचा जीवनप्रवास...