आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंट व्हॅलेन्टाइनची गोष्ट, वाचा कोण होते व्हॅलेंटाइन आणि का साजरा करतात हा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सर्वच जण व्हॅलेंटाइन डे साजरा करतो मात्र या दिवसाचे नाव कसे तयार झाले हे आपल्याला माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला सेंट व्हॅलेन्टाइनबद्दल माहिती सांगणार आहोत. व्हॅलेन्टाइन हा शब्द ‘व्हॅलेन्टिनस’ या मूळ लॅटिन शब्दावरून आला आहे. व्हॅलेन्सचा अर्थ लायक, बलवान व शक्तिशाली असा होतो. सेंट म्हणजे पवित्र लोक. प्राचीन रोममध्ये ज्या संतांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांना व्हॅलेन्टाइन असे म्हणत. असे 14 सेंट व्हॅलेन्टाइन होऊन गेले. 14 फेब्रुवारीस सेंट व्हॅलेन्टाइन यांना रोमच्या उत्तरेस फ्लॅमिनिया या त्या वेळच्या प्रमुख राजमार्गाजवळ दफन करण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाइन डे म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र, या सर्व संतांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध नाही. पूर्वेकडील परंपरावादी ख्रिश्चन मात्र ‘सेंट व्हॅलेन्टाइन प्रेसबायटर’ यांचा स्मृतिदिन 6 जुलै रोजी, तर ‘बिशप हायरोमॉर्टर’ यांचा 30 जुलै रोजी साजरा करतात. ग्रीक परंपरावादी ख्रिश्चन मात्र 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेन्टिनस (पुरुष संत) किंवा व्हॅलेन्टिना (स्त्री संत) डे साजरा करतात. इ. स. 496 मध्ये सर्वप्रथम पोप सेंट ग्लेशियस यांनी सेंट व्हॅलेन्टाइनची प्रतिस्थापना केली. त्यांच्या मतानुसार सेंट व्हॅलेन्टाइन यांचे नाव जरी मानवी असले, तरी त्यांची कृती मात्र परमेश्वरासारखीच असते.