आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Shivinder The Businessman Of Cycle Industry

समर्पण - निवृत्तीच्या टप्प्यात अॅडव्हेंचर बाइकची निर्मिती, आता १८ पट पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवइंदर सिंह : फायरफॉक्स बाइक्सचे मालक
वय : ६५ वर्षे
शिक्षण:आयआयटी दिल्लीतून सिव्हिल इंजिनिअरिंग, आयआयएफटीतून पीजी
चर्चेत : Story of Shivinder the Businessman of Cycle Industry. Read at divyamarathi.comStory of Shivinder the Businessman of Cycle Industry. Read at divyamarathi.com.

२००४ मध्ये शिवइंदर सिंह यांना निवृत्त होण्यासाठी चार वर्षांचा अवधी होता. परदेशात एका लग्नामध्ये प्रदीप मेहरोत्रा या जुन्या मित्राची त्यांची भेट झाली. त्यांचे तैवानमध्ये सायकल निर्मितीचे युनिट होते. त्यांनीच यासाठी सिंह यांना प्रोत्साहन दिले. शिवइंदर यांच्या नोकरीचा कार्यकाळ गारमेंट निर्यातीमध्ये गेला होता. मात्र, मित्राच्या सल्ल्याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला. दोघा मित्रांनी ४ कोटी रुपये भांडवलातून कंपनी उभी केली. ग्रेटर नोएडामध्ये कार्यालय व दहा लोकांसोबत काम सुरू केले. प्रीमियम बाइक्ससोबत दोघांनी इम्पोर्टेड सायकली बाजारात आणल्या. यासंदर्भात शिवइंदर म्हणाले, आपण कोणते सर्वेक्षणही केले नव्हते. फक्त स्टीव्ह जॉब्जचा मंत्र डोक्यात होता. तुम्ही सृजनात्मक उत्पादन आणत नाहीत, तोपर्यंत काय हवे ते ग्राहकाला कळत नाही. पहिल्यांदा मुलांचा विचार केला. इंडिया गेटपासून चाणक्यपुरीपर्यंत बाइक रॅली केली. त्यादरम्यान अमेरिकी एनजीओशी ओळख झाली. अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट ट्रेक बाइक्सशी जोडला होता. सात वेळा टूर दी फ्रान्स जिंकणारा लान्स आर्मस्ट्राँग त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यानंतर शिवइंदर यांनी वेळ न दवडता ट्रेक बाजारात आणले.