आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of The Great Maratha King Sambhaji Maharaj

दिवसातील 20 तास असायचे घोडदौडीवर, मेहुण्याने केला दगाफटका, वाचा राजे संभाजींबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना त्‍यांच्‍याच मेहुण्‍याने दगाफटका करुन औरंगजेबाकडे स्‍वाधीन केले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा घरभेद्यांमुळेच मृत्‍यू झाला.
1 फेब्रुवारी, इ.स. 1689 रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिंदे आणि औरंगजेबचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिंदेने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
संभाजीराजांचा राज्‍याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. आपल्‍या नऊ वर्षांच्‍या कारभारात संभाजीराजांनी अतुलनीय कामगिरी केली. छत्रपती संभाजी राजांचा राज्‍याभिषेक झाल्‍यानंतर स्‍वराज्‍याला अधिकच बळकटी आली. स्‍वच्‍छ प्रशासन, उत्‍तम कारभार, दृढ निश्‍चय, अद्‌भुत आणि अचाट धैर्यशिलतेसाठी छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. संभाजी राजांनी नऊ वर्षांत 240 लढाया लढल्‍या. संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
संभाजी राज्‍यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले. स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला. नवी गावे बसवली. व्यापारी पेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले. आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली. लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू), पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली (जानेवारी, इ.स. 1681 - मार्च 11, इ.स. 1689), त्‍यांचा कार्यकाळ अतुलनीय असाच आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, छत्रपती संभाजी महाराजांविषयी काही खास गोष्‍टी... बालपण.. मनसबदारांशी वाद.. संभाजी राज्‍यांच्‍या लढाया.. मृत्‍यू.. आदी...