आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगळेवेगळे: लेखनामुळे नाकारली वर्ल्ड बँकेची नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगळेवेगळे | विक्रम सेठ, लेखक
>जन्म- २० जून १९५२
>कुटुंब- आई- लीला सेठ (सेवानिवृत्त न्यायाधीश), वडील- प्रेम सेठ, भाऊ-शांतम, बहीण- आराधना
शिक्षण- सेंट झेव्हियर स्कूल पाटणा, नंतर डून स्कूलमध्ये दाखल, इंग्लंडच्या टोनब्रिज स्कूलमधून ए-लेव्हल्स, ऑक्सफर्डच्या कॉर्पस क्रिस्टी महाविद्यालयातून पदवीधर, स्टॅनफोर्डमधून अर्थशास्त्रात पदवीधर.

चर्चेचे कारण- त्यांची बहुप्रतीक्षित 'अ सुटेबल गर्ल' ही कादंबरी याच आठवड्यात प्रकाशित होत आहे. हा त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीचा सिक्वेल आहे.

१९९३ मध्ये त्यांनी 'अ सुटेबल बॉय' नामक कादंबरी लिहिली होती. २००९ पासून त्याच्या सिक्वेलची चर्चा होती. मात्र, आता त्यास मुहूर्त मिळाला आहे. यासाठी पेंग्विन प्रकाशनाकडून त्यांना मिळालेला अॅडव्हान्स मात्र आता परत द्यावा लागेल. विक्रम सेठ यांना बालपणापासूनच लेखनाचा छंद आहे. डून शाळेत असताना ते शाळेच्या साप्ताहिकाचे संपादक होते. लंडनमध्ये असताना काव्यात रुची निर्माण झाली. स्टॅनफोर्डमध्ये अर्थशास्त्रात पीएचडीची तयारी करतनाच त्यांना चिनी भाषा आवडू लागली. तेव्हा त्यांनी वांग वी नामक चिनी कवीच्या रचनांचा इंग्रजी अनुवाद वाचला. नंतर त्यांनी चीनमध्ये जाऊन चिनी भाषा शिकण्याचा संकल्प सोडला. त्यांनी नानजिंग विद्यापीठात प्रवेश घेऊन अध्ययन केले. ऐंशीच्या दशकात चीनमध्ये संशोधनकार्य करणे कठीण होते. तियानमेन घटनेच्या आठवडाभरापूर्वी ते चीनमधून मायदेशी परतले. दरम्यान, विक्रम सेठ यांनी वेल्श, जर्मन, फ्रेंच, मेंडेरिन, इंग्रजी, हिंदी, उर्दू इत्यादी भाषांचा अभ्यास केला.

सेठ कादंबरी लेखनासाठी प्रचंड मेहनत घेतात. संशोधनासाठी एकदा तर त्यांनी नेपाळ सीमेलगत उत्तर प्रदेशमधील एका वीज नसलेल्या गावात त्यांच्या उर्दू शिक्षकांसोबत वास्तव्य केले. कधी-कधी कुंभमेळ्यात जाऊनही संशोधन करत बसतात. त्यांचे बंधू शांतम हे बौद्ध धर्माच्या अाध्यात्मिक सहलींचे आयोजन करतात, तर बहीण आराधना चित्रपट निर्मात्या आहेत. सेठ यांचा ऑस्ट्रेलियातील नोकरशहा महिलेशी विवाह झाला आहे. त्यांना जागतिक बँकेकडून नोकरीचाही प्रस्ताव मिळाला होता. त्यांनी नोकरी स्वीकारून पाच वर्षांनंतर सोडून द्यावी आणि नंतर पेन्शन घेत बसावे, अशी त्यांच्या आईची इच्छा
होती. मात्र, कवितेच्या प्रेमापोटी विक्रम सेठ राजी झाले नाहीत.