आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदुकीच्या टोकावर शिवला सोन्याचा शर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड (पुणे)- पुण्यातील दत्ता फुगे आणि त्यांचा सोन्याचा शर्ट सध्या खूप चर्चेत आहे. ते शर्ट घालून निघतात तेव्हा आजूबाजूला 20 सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. पण त्यांच्या या झगमगाटामागे आहे तेजपाल रांका आणि त्यांची टीम. रांका ज्वेलरी डिझायनर आहेत आणि या व्यवसायात त्यांचे कुटुंब 133 वर्षांपासून आहे. या शर्टची कल्पना आणि ती सत्यात उतरेपर्यंतचा प्रवास खूप रोमांचक असल्याचे ते सांगतात. चार बंदूकधा-यांच्या कडेकोट बंदोबस्तात तो शिवण्यात आला. रांकाची टीम कामाला लागली. वर्कशॉपमधून 50 वर्षांपूर्वीचे साचे काढले. याच साच्यांचा उपयोग शिवणकामासाठी करण्यात आला. राजू मंडल यांच्या नेतृत्वाखाली 16 बंगाली कारागिरांवर शर्ट शिवण्याची जबाबदारी होती.

देशातील 50 टक्के दागिने बंगाली कारागीरच तयार करतात. त्यांच्या कौशल्याची ख्याती जगभरात आहे. त्या 15 दिवसांतील दररोज रात्री घरी जाण्यापूर्वी ते वर्कशॉपमधील शर्टची प्रोग्रेस पाहत असत. पण दत्ता फुगेंना तो पाहायची परवानगी नव्हती. शर्टची माहिती त्यांना फक्त फोनवर मिळत होती. या प्रक्रियेत त्यांना फक्त शर्टचे माप घेण्यासाठी बोलावले गेले.

लग्नाच्या वाढदिवसासाठी...
दत्ता फुगे पिंपरी-चिंचवडमधील एक नामवंत मोठे व्यावसायिक आणि सावकारही आहेत. आपल्या एकूण उत्पन्नातील मोठा वाटा ते सोन्यामध्येच गुंतवतात. त्यांना ही खात्रीशीर गुंतवणूक वाटते. त्यामुळे रांका यांच्याशी त्यांची ओळख होती. या वेळी दत्ता गुंतवणूकविषयक सल्ला घेण्यासाठी गेले तेव्हा रांका यांनी त्यांना सोन्याचा शर्ट शिवायची कल्पना सुचवली. राजे-महाराजांचे चिलखत पाहून आलेल्या दत्ता यांनी तत्काळ होकार दिला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे सर्व ठरले. 21 डिसेंबरच्या आत शर्ट शिवून मिळावा, अशी दत्ता यांची इच्छा होती, जेणेकरून ते लग्नाच्या वाढदिवसाला शर्ट घालू शकतील.