आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूर्तींचे सौंदर्य नव्हे तर श्रद्धेचे स्तर बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजनाचा तात्पर्य म्हणजे आराधना. निराकार ईश्वराप्रती मनात आस्थेचे भाव जागृत करण्यासाठी मूर्ती, प्रतिमांना ईश्वराचे रूप समजण्यात येऊ लागले. देवांच्या मूर्ती आणि प्रतिमांच्या पूजनाने मनात सकारात्मक भाव निर्माण होतो. गणेशोत्सव खूप जवळ आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पुन्हा एकदा गावात, शहरात, गल्लीबोळात, चौकाचौकात गणपतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात येईल. पुराणात असा उल्लेख आहे की, भगवान विष्णूंनी गणपतीच्या कृपाप्रसादासाठी सिद्धक्षेत्रात कठोर तपश्चर्या केली
होती. गणपतीने त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिले, तेव्हा भगवान विष्णूंनी गणपतीची मातीची मूर्ती स्थापन केली. पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचाही शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. हे शिवलिंगसुद्धा
मातीचेच असतात. तात्पर्य हेच की, आदिकाळांपासून शास्त्र, पुराण, कथांमध्ये मातीपासून बनवलेल्या मूर्तीचीच पूजा करण्यात आली आहे. परंतु या युगात चुकीची परंपरा सुरू करण्यात आली आहे आणि ती पिढी दर पिढी पुढे थोपवली जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी 15 दिवसांपासून महिनाभरापर्यंतचा कालावधी लागतो. हे यामुळे प्रदूषणातही वाढ होते. याउलट मातीच्या मूर्ती मात्र एकाच दिवसात पाण्यात विरघळून जातात. आजच्या स्थितीत पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती नव्हे तर मातीच्याच मूर्ती उपयुक्त आहेत. शुद्ध मातीपासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन घरी सहजपणे करता येऊ शकते. त्यामुळे हेच योग्य राहील की, आस्था, श्रद्धा, पूजा, आराधनेनंतर आपण पाण्यात पीओपीचे विष कालवू नये. पाणी मानवी
जीवनासाठी उपयुक्त बनून राहू द्या. दैनिक भास्करने सामाजिक जागरुकतेच्या दिशेने प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. या आपण सर्व मिळून जल आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा संकल्प करूया.