आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी कला शाखेची, गुंतवणूक मात्र टेक्नो स्टार्टअप्समध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सृजनशील माइक जोन्स, इंटरनेट आंत्रप्रेन्युअर
सोशल मीडियात सुरुवातीचे काेणते नाव असेल तर ते माय स्पेसचे होते. माइक जोन्स त्याचे सीईओ होते. २० वर्षांपासून लॉस एंजलिसमध्ये वास्तव्यास असलेल्या जोन्स यांनी कला शाखेची पदवी घेतली खरी, परंतु त्यांना इंटरनेटच्या जगात विशेष रस आहे. लॉस एंजलिसमध्ये त्यांनी सायन्स इंक नावाचा स्टुडिओ स्थापन केला असून त्यात गुगलचे प्रमुख एरिक श्मिटसारख्या लोकांनी पैसा गंुतवला आहे.
माइक जोन्स यांनी ३० हून जास्त स्टार्टअपमध्ये पैसा गंुतवला आहे. यापैकीच एक माय स्पेस होती. सायन्स फंडसाठी त्यांनी १९० कोटी रुपये ठेवले आहेत. आम्ही एंजल फंडप्रमाणे काम करणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात भारत जगात स्मार्टफोनच्या प्रकरणात अमेरिकेला मागे टाकेल. या गुंतवणुकीच्या आधी ते भारताच्या शाबाज अहमद यांना मोबाइल अॅपसाठी मदत करत होते. अहमद एम. एस. रमैया इन्स्टिट्यूटमधील फ्रेश ग्रॅज्युएट आहेत. त्यांचे अॅप "सिंपली' प्रीपेड मोबाइलवर त्यांच्या खर्चाच्या पद्धती आणि फसवणुकीची माहिती देते. माइक यांनी यामध्ये पैसा गंुतवला आहे. त्यांना भारतात येण्यास आवडते. त्यामुळे ते अनेकदा भारतात येत असतात.

जन्म - ६ जानेवारी १९८१
शिक्षण - बॅचलर ऑफ आर्ट््स, इंटरनॅशनल बिझनेस, युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन
कुटुंब - पत्नी जेनिफर (मानसोपचारतज्ज्ञ), दोन मुले
चर्चेत - नुकतीच त्यांनी सायन्स इंडिया फंड स्थापण्याची घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...