आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटपुंज्या साधनांनी क्रियाशीलतेला प्रोत्साहन अन् तणावमुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांना यशाची व्याखा विचारल्यास ते सांगतील, वस्तू खरेदीसाठी खूप पैसा, कामासाठी अधिक वेळ आणि माहिती मिळवण्यासाठी जास्त ज्ञानाची त्यांना गरज आहे.  हा मार्ग आकर्षक असला तरी ताज्या सर्वेक्षणाने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
अधिक काही मिळवण्यावर आपले लक्ष असते तेव्हा आपल्याकडे आधीपासूनच जी वस्तू असते तिचे मूल्य आपोआप कमी होते. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आवश्य पावले उचलण्याऐवजी साधने जमवण्यात आपण गर्क होते. जसा वेळ जाईल तसे  अधिक मिळवण्याच्या नादात आपण अधिक दु:खी बनतो.

यश मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे. लवचिकतेचे विज्ञान अधिक मिळवण्याऐवजी आपल्याला प्रोत्साहित करणारे प्रभावी आणि अधिक आनंद देणारे पर्याय आपल्यासमोर ठेवते.  अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे की, काही लोक थोडक्यात खूप काही मिळवतात तर काहीजण खूप जास्त गमावतात. लवचिकतेत व्यवहारिक शहाणपण आणि साधने समाविष्ट आहेत जी कोणीही वापरू शकते.
 
 आपण पूर्ण शक्ती लावतो तसेच साधने जमवतो. अंताची काळजी करण्यापेक्षा त्याची क्षमता जोखू लागतो. यामुळे आपल्या हाती जे काही आहे, मग तो पैसा असो, वेळ, वस्तू वा नाती , त्यामुळे संधीचे अनेक दारे उघडी होतात
 
लवचिकतेमुळे साधनांना अनुरूप बदल करणे सहजशक्य होते. अचानक संकट आल्यास परिवर्तन आणि लवचिकतेच्या सवयीमुळे आपण आव्हानांचा सामना करायला सिद्ध होतो. खूप जास्त साधने असल्यास लक्ष विचलित होते. चुकीचे लक्ष्य निश्चित होते. साधने वाया जातात. डॉटकॉमचा फुगा फुटण्याऐवजी संपत्तीचा बाजार उठवण्यावर लक्ष्य केंद्रित करा. 

लवचिकतेची सुरुवात करण्यासाठी एक साधा प्रश्न विचारा : माझ्याकडे जी साधने आहेत,  त्यातून मी काय करू शकतो. त्यामुळे चांगले मिळवण्यासाठी अधिक साधने मिळवण्याच्या  जाळ्यातून बाहेर पडू. दुसऱ्यांच्या तुलनेत साधने कमी असल्याने लवचिकता तणावापासून वाचवते. मनोवैज्ञानिकांना आढळले आहे की, तुम्ही नेहमीच दुसऱ्यांशी तुलना कराल तर चांगले परिणाम मिळणे आणि आनंद मिळणे फारट कठीण आहे. कमी साधने असल्यास आपण जास्त क्रियाशील होतो. अडथळे आपल्याला समस्यांवरील उपाय शोधण्यात नवा प्रकाश देते. नव्या संधी बहाल करते.

कमी साधनांची शक्ती कलाकारांपासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत चांगले काम करण्याची क्षमता बहाल करते. कमी साधनांमुळे एखादी गोष्ट आपण पारंपरिक पद्धतीने करत नाही. त्यामुळे अभ्यासअंती हे स्पष्ट झाले आहे की, जीवनातील काही कठीण समस्या अशा लोकांनी सोडवल्या आहेत ज्यांना समस्या काय असते हे माहीतच नव्हते. तुम्ही स्वत:च समस्या निर्माण करून हा फंडा वापरू शकता. कामाची डेडलाइन निश्चित करा वा बजेटमध्ये कपातही करता येईल. समस्यांमध्येही लक्ष्य गाठता येईल.
 
आपल्याला काही बाबतीत गरजेपेक्षा अधिक करण्याच्या प्रवृत्तीपासून सावधान राहिले पाहिजे. 
वेळ : एखाद्या प्रोजेक्टमध्ये स्वत:ला पूर्ण झोकून देणे चांगली बाब आहे. मात्र क्रियाशीलता वाढवण्यासाठी आपल्याला थोड्याशा विश्रांतीची गरज आहे.
 
फेसबुक : मित्रांची संख्या वाढवण्याऐवजी अशा लोकांशी नाते निर्माण करा जे मदत करतील.
पालकत्त्व : मुलांना कामात पूर्ण स्वातंत्र्य द्या. चुकांमधून ते शिकतील आणि पुढे जातील.
व्यायाम : खूप जास्त पायी चालण्यापेक्षा एखादा हलकासा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.
घर बनवणे : खूप मोठे घर बनवण्याचा आग्रह धरू नका. आपल्या शक्तीनुसार घर बनवा.
एक अन्य मार्ग : स्वत:ला वेगळ्या परिस्थितीत ठेवा. रुटीनलाच कवटाळून बसू नका.
 
(लेखक सोनेनशीन राइस विद्यापीठात व्यवस्थापनाचे प्रोफेसर आहेत. ) 
बातम्या आणखी आहेत...