आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने हात आखडता घेतल्याने रखडलेल्या प्रकल्पाचे मिशन शास्त्रज्ञांनी २०-२० तास काम करून केले यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- इस्रोत सध्या ४००० महिला कार्यरत आहेत. सर्वांचे जीवन वेळेच्या काटेकोर व्यवस्थापनावर चालते, अगदी उपग्रहाप्रमाणे. याचे कारण म्हणजे, महिलांना पुरुष शास्त्रज्ञांपेक्षा दुप्पट काम करावे लागते. १५ फेब्रुवारी रोजी इस्रोने १०४ उपग्रह प्रक्षेपित केले. यादरम्यान ओढवलेल्या कठीण प्रसंगात शास्त्रज्ञ जी. मंगलम व जयश्री जना भट्टाचार्य यांच्या टीमने फार कमी वेळेत हे आव्हान पूर्ण केले.  

जयश्रींनी पेलले आव्हान 
‘१५ फेब्रुवारी रोजी इस्रोच्या केंद्रात शांतता होती. ट्रॅकिंग - पोझिशनची घोषणा झाली- सर्व उपग्रह निश्चित वेळेत असून मिशन फत्ते झाले.’ हे शब्द कानावर पडल्यावर आनंदाश्रू आल्याची भावना जयश्रींनी व्यक्त केली. आम्ही २ महिने १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत होतो. अमेरिकी उपग्रहाच्या आधारावर इक्विपमेंट बे बनवला होता. मात्र, डिसेंबरमध्ये अमेरिकेने हा करार रद्द केला. ‘इक्विपमेंट बे’मध्ये जी जागा तयार केली होती, त्यात काय बसवावे अशी समस्या होती. ६० दिवस शिल्लक होते. मात्र, उपग्रह निर्मितीसाठी हा खूप कमी अवधी होता. मोहीम लांबवणे अशक्य होते. त्यामुळे आम्ही उपग्रह निर्मिती करण्याचेच ठरवले. दररोज २२ तास काम केले.
 
जी मंगलम यांनी पूर्ण केले...
प्रक्षेपणासाठी काही दिवस शिल्लक असताना गुणवत्ता नियंत्रणाचे काम बाकी होते. जी. मंगलम यांनी ते केले होते. एवढ्या कमी अवधीत प्रत्येक उपग्रहाचे उपकरण, सॉफ्टवेअर, सेटिंगची तपासणी करणे कठीण होते. एखादी चूकही परवडणारी नव्हती. सात दिवस २०-२० तास काम करत राहिलो. अनेक सदस्य तीन-तीन दिवस घरीही गेले नव्हते. 
बातम्या आणखी आहेत...