आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या वर्षी नापास, नंतर कर्करोग उपचारात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयालक्ष्मी देशमाने, कर्करोगतज्ञ
- जन्म- :१९५५
- आई :रत्नम्मा, वडील: बाबूरावमजूर, बहिणी एक भाऊ {शिक्षण:एमबीबीएस
- कुटुंबीय:अविवाहित
चर्चेत:प्रतिष्ठित किडवई रुग्णालयाच्या अाँकोलॉजी विभागाच्या एचओडी पदावरून देशमाने नुकत्याच निवृत्त झाल्या.
कर्नाटकच्या कलबुर्गीतील गाझीपूरच्या नाटिकेरी या दाट वस्तीत विजयालक्ष्मी यांचा जन्म झाला. आई भाजी विकायची. लहान विजयालक्ष्मीही तिच्यासोबत डोक्यावर परडी घेऊन फिरायची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. वडील एमएसके मिलमध्ये मजुरी करायचे. त्या काळी फक्त मुलांनाच शिकायला पाठवले जायचे. मात्र, वडिलांच्या जिद्दीमुळे विजयालक्ष्मींच्या सर्व बहिणी शाळेत जायच्या. विजयालक्ष्मी सांगतात, मी बारावी उत्तीर्ण झाले. एकदा अमावास्येच्या रात्री आईने मला बोलावले. एकमेव दागिना असलेले मंगळसूत्र वडिलांकडे देत तो विकून माझ्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाची व्यवस्था करण्यास सांगितले. शेवटी कर्नाटकच्या वैद्यकीय महाविद्यालयात विजयालक्ष्मी यांना प्रवेश मिळाला. मात्र, इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे एमबीबीएसच्या पहिल्याच वर्षी त्या अनुत्तीर्ण झाल्या. प्राध्यापकांच्या मदतीने दुसऱ्या वर्षी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी मात्र त्या अव्वलच असायच्या. बेल्लारीतून १९८३ मध्ये एमएसची पदवी मिळवली. स्तनाच्या कर्करोगाचे निदान उपचारात त्यांना प्रावीण्य आहे. कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तरबेज डॉ. विजयालक्ष्मी सांगतात, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित यांची प्रेरणा घेऊन वडिलांनी माझे नावही विजयालक्ष्मीच ठेवले. ईश्वरकृपेने आयुष्यातील एकही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली नाही याचा मला आनंद आहे. दरम्यान, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने १९९९ मध्ये त्यांचा "वुमन ऑफ इयर' पुरस्काराने सन्मान केला. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या त्या कर्नाटक कर्करोग सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत. महिन्यातून १५ दिवस त्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी नि:शुल्क शिबिराचे आयोजन करतात.