आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश- राफेल नदाल, टेनिस खेळाडू; विमानात पुस्तकं विसरली अन् शिक्षण सुटले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदालचा एक अर्थ स्पेनच्या लोकभाषेत केटेलन किंवा मेलोरकनमध्ये ख्रिसमस असा होतो. स्पॅनिशवंशीय राफेल स्पेनच्या मेलोर्का बेटावर बालपणापासून राहतो. तेथे मेलोरकन ही भाषा आहे. राफेलचे वडील सिबेस्टिन विमा कंपनीचे आणि खिडक्यांत बसवल्या जाणाऱ्या काचांचा व्यवसाय करतात. त्यामुळे दुकानाबाहेरही काच लावलेले असत. राफेल लहान होता, तेव्हा तेथून जाणाऱ्या स्पोर्ट््स कारचे त्याला वेड होते. मी अशीच कार घेईन, असे त्यांची गती पोहून तो वडिलांना म्हणते असे. वडील स्मितहास्य करत.
 
नदाल कुटुंबात सर्व जण खेळाडू होते. खेळ त्यांच्या नसानसात भरलेला. पण राफेलएवढे भाग्य कोणाला लाभले नाही. राफेल कुटुंबातील थोरला नातू, त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष होते.  राफेलचे धाकटे काका मिगुअल एंगेल स्पेनच्या फुटबॉल संघात होते. त्यामुळे राफेल सध्या रिअल माद्रिद फुटबॉल क्लबला मदत करतो. राफेलची टेनिसमधील प्रतिभा त्याचे मोठे काका टोनी यांनी हेरली. राफेल तीन वर्षांचा असल्यापासून टोनी त्याला खेळायला सोबत नेत असत. राफेलने कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली तरी टोनी त्याच्या खेळाची प्रशंसा करत नसत. त्याच्यातील उणिवा शोधून ते त्यावर सल्ला देत असत. टोनी सांगतात की, मी फोरहँड कमकुवत असल्याने चांगला खेळाडू होऊ शकलो नाही. तीच कमतरता पुतण्यात नसावी, असे मला वाटायचे. काकांमुळेच वयाच्या ८ व्या वर्षी राफेल विभागीय टेनिस विजेतेपद जिंकू शकला. तेव्हा तो मोठ्या काकासोबत फुटबॉलही खेळत असे.  
 
आई-वडील कठोर शिस्तीचे होते. त्याचे वडील सर्वात थोरले. त्यामुळे दोन्ही काका त्यांचेच ऐकत. जेवण्याच्या टेबलवर कोणी बोलत नसे. डायनिंग टेबलवर ताठ बसावे लागायचे. नाष्टा आणि जेवणाचा नियम होता. आजही राफेल कडधान्य, मोसंबी रस, मिल्क चॉकलेट ड्रिंक हा नाष्टा घेतो. कॉफी घेतच नाही. एखाद्या सामन्यात पराभव झाला तरी विरोधकांना शुभेच्छा दे, अशी शिकवण वडिलांनी दिली होती. टेनिसमुळे शिक्षणावर परिणाम होत असल्याचे त्याच्या आईला वाटत होते. त्यामुळे राफेलला बोर्डिंगच्या बेलेरिक स्पोर्ट््स स्कूलमध्ये टाकण्यात आले.
 
शाळेच्या दिनचर्येने राफेल घाबरला. कशी तरी शाळा पूर्ण केली. विद्यापीठात प्रवेश घ्यावा, असे आईला वाटायचे. केनरी बेटावरून ज्या विमानात आईसोबत घरी परतत होता, त्यातच सर्व पुस्तकं विसरला आणि तेथेच शिक्षणही सुटले. आज राफेल प्रख्यात आहे, पैसा प्रचंड मिळतो. दहा वर्षांपूर्वी राफेल नदाल फाउंडेशन स्थापन केले. त्याची प्रकल्प संचालक जिस्का पेरेलो असून ती राफेलची गर्लफ्रेंड आहे.
 
जन्म : ३ जून १९८६  
शिक्षण : बेलेरिक स्पोर्ट््स स्कूलमधून शालेय शिक्षण  
वडील : सिबेस्टिन, आई : अॅना मारिया परेरा, बहीण : मेरिबेल  
चर्चेत का? : अलीकडेच त्याने १६ वे ग्रँडस्लॅम जिंकले.  
बातम्या आणखी आहेत...