आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरविरोधी औषध स्वस्त होण्यास कारणीभूत जज करताहेत भाषांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म - १९४९
वडील - बी. व्यंकटरमणी
शिक्षण - इंग्रजीत बीए, एलएलबी
कुटुंब - पती बी. श्रीदेवन (वकील), दोन मुले.
चर्चेत - त्यांनी नुकतेच एका पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
या १२० गोळ्यांना २.८ लाख रुपये मोजावे लागत होते. त्या वेळी कंट्रोलर ऑफ पेटंट्सने भारतीय कंपनी नेटकोला दिलेल्या आदेशात या औषधाची जेनेरिक मात्रा ८,८०० रुपयांत विकण्यास सांगितले. या निकालामुळे कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळाला. न्यायमूर्ती प्रभा श्रीदेवन यांनी हा निकाल दिला होता. त्यांनी म्हटले होते, आम्ही नेटकोना औषध निर्मितीस रोखले किंवा स्थगिती आदेश बजावल्यास सर्वसामान्य लोकांच्या हितांवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. या लोकांना अशा औषधांची खूप आवश्यकता आहे.

प्रभा श्रीदेवन मद्रासमध्येच शिकल्या. इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लग्न केले. पदवीनंतर १३ वर्षांनी त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. दोन मुले झाल्यानंतर लॉच्या वर्गाला जात होते तेव्हा माझ्यापेक्षा अनेक विद्यार्थी १३ वर्षांनी लहान होते,असे त्यांनी सांगितले. पती वकील असल्यामुळे पदवीनंतर काम करण्यात काहीही अडचण आली नाही. २००० मध्ये त्यांची मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाली. तेव्हाच्या त्या पाचव्या महिला न्यायमूर्ती होत्या. पदावर असताना त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी आले. उदा : दा विंची कोड, मानसिकदृष्ट्या गंभीर आजारी नतालियाच्या हक्कासह अन्य प्रकरणांचा समावेश आहे.

१० वर्षे न्यायमूर्तीपदी राहिल्यानंतर त्या इंटरलेक्चुअल प्रॉपर्टी अपिलेट बोर्डच्या चेअरमन झाल्या. २०११ नंतर १३ वर्षे त्या या पदावर होत्या. इथे त्यांनी याहूच्या पेटंटसारखी प्रकरणे हाताळली. त्यांचे वडील रेल्वेमध्ये महाप्रबंधक होते. मात्र, आजोबा व्ही. कृष्णस्वामी अय्यर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. दोनपैकी एक मुलगा श्रीनाथ श्रीदेवनही वकिली करतो.
न्या. श्रीदेवन यांना इंग्रजी साहित्याची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पुस्तकांचे भाषांतरही केले आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तामिळ लेखक आर. चुडामणी यांच्या कथेचे त्यांनी भाषांतर केले असून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने त्याचे प्रकाशन केले आहे.